आमटी-रस्सा विसरा अन् ट्राय करा शेवगा फ्राय; भात, पोळी, भाकरीसोबत लागेल भन्नाट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

आमटी-रस्सा विसरा अन् ट्राय करा शेवगा फ्राय; भात, पोळी, भाकरीसोबत लागेल भन्नाट

आमटी किंवा रस्सा नव्हे, यावेळी बनवा शेवग्याच्या शेंगांची कुरकुरीत फ्राय. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चविष्ट रेसिपी भात, पोळी आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते.

Mayuri Gawade

शेवग्याच्या शेंगा म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यासमोर आमटी किंवा रस्सा भाजी येते. मात्र, याच शेवग्यापासून एक वेगळी आणि चवदार डिशही तयार करता येते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला शेवगा फ्राय हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवायला सोपा असून जेवणाची चवही वाढवतो.

साहित्य

  • शेवग्याच्या शेंगा

  • रवा

  • तांदळाचे पीठ

  • लसूण

  • हिरवी मिरची

  • कोथिंबीर

  • लाल तिखट

  • गरम मसाला

  • हळद

  • मीठ

  • तेल

  • पाणी

कृती

सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ घाला आणि शेंगा अर्धवट शिजेपर्यंत उकळून घ्या. शेंगा जास्त शिजू देऊ नका. त्यानंतर त्या बाहेर काढून थंड होऊ द्या आणि मधोमध चिरून दोन भाग करा.

आता मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून जाडसर वाटण तयार करा. हे मिश्रण शेंगांना लावून काही मिनिटे मुरू द्या.

दुसऱ्या भांड्यात रवा, तांदळाचे पीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ एकत्र मिसळा. मुरवलेल्या शेंगा या मिश्रणात घोळवून घ्या.

तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. त्यावर शेंगा व्यवस्थित मांडून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

गरमागरम शेवगा फ्राय भात, पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठीही हा पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतो.

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

रेल्वेच्या AC डब्यात चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशाचा VIDEO चर्चेत; अशी चूक करू नका; प्रवासात 'या' वस्तू आहेत बॅन!

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video