PM
PM
लाईफस्टाईल

तुम्हाला पण ड्रीम हाऊस हवे आहे ?कमी बजेटमध्ये सजवा घर, जाणून घ्या काही टिप्स

Swapnil S

लूक आपले एक सुंदर घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. बरेच लोक त्यांच्या आयुष्यात स्वप्नातील घर साध्य करतात, पण काहीजण बजेटच्या प्रॉब्लेम ते साध्य करू शकत नाहीत. परंतु, आपल्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की, एका सुंदर घराला बजेटची नसून सर्जनशीलतेची गरज असते. सुंदर घरासाठी मोठेच घर असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमचे छोटे घरसुद्धा कमी बजेटमध्ये आकर्षक आणि सुंदर बनवू शकता. कमी बजेटमध्ये घर सर्जनशीलतेने अतिशय सुंदर बनवता येवू शकते, कसे कराल ते घ्या जाणून.

मेन गेटची सजावट-

मेन गेटची सजावट विशेष असावी मुख्य द्वार हा तुमच्या घराचा चेहरा आहे. त्यामुळे मुख्य दाराजवळची सजावट चांगली ठेवली जाणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे मेनगेट सजवण्यासाठी फुले किंवा मातीची सजावट वापरू शकता. हँगिंग विंड चाइम आणि आकर्षक सजावट इथे छान दिसेल. तुम्ही येथे नेमप्लेटचा प्रयोगही करू शकता आणि घरात खाली सुंदर भांड्यांमध्ये झाडे लावू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही.

बेडरूमला बनवा खास-

जर तुमच्याकडे घर रंगविण्यासाठी बजेट तेवढा नसेल तर संपूर्ण घर रंगवण्याऐवजी दिवाणखान्याची एक भिंत सुंदर रंगाने रंगवा. आपण येथे वॉल पेपरचा देखील उपयोग करू शकता. हे आपल्या घराचे रूप बदलून टाकू शकते. भिंतीची सजावट महागडी सजावट विकत घेण्याऐवजी तुम्ही घरी काही हस्तकला किंवा सजावट देखील करू शकता. आपण कुटुंबाचा फोटो देखील घरी फ्रेम करून लावू शकतो. हे आपल्या भिंतीला नवीन रूप देईल.

झुंबर घराला देते नवीन लूक-

झुंबर घराला नवीन लूक देते जर तुम्ही दिवाणखान्यात झूमर लावले तर ते घराचे स्वरूप शाही करेल. प्रत्येक कमी अधिक किंमतीमध्ये झूमर उपलब्ध आहेत. फॅन्सी लाइट्स किंवा हँडक्राफ्ट झूमर असतील तर अधिक आकर्षक दिसू शकते.

सोफ्याचे स्वरूप बदला-

तुम्ही तुमच्या जुन्या सोफ्याला नवीन रूप देण्यासाठी कव्हर आणि कुशन बदलू शकता. गडद सोफ्याच्या कव्हरवर, आपण हलके किंवा चमकदार रंगाचे लहान किंवा मोठे कुशन ठेवावेत. अशा प्रकारे तुमच्या घराला एक नवीन आणि सुंदर लुक मिळेल.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस