Ashadhi Ekadashi 2024 Date, Time, Rituals and Significance FPJ
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची वेळ

Tejashree Gaikwad

Ashadhi Ekadashi 2024 Date: आषाढी एकादशीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. भागवत संप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. महाराष्ट्रातील हजारो भाविक वारी करून पंढरपूरला जातात. परंतु तुम्हाला पंढरपूरला (Pandharpur)जायला मिळालं नसेल तर तुम्ही घरच्या घरी मनोभावे पूजा (Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home) करू शकता.

आषाढी एकादशी २०२४ तारीख आणि वेळ

यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. एकादशी तिथी १६ जुलै रोजी रात्री ८.३३ वाजता सुरू होईल आणि १७ जुलै रोजी रात्री ९.२ वाजता समाप्त होईल.

आषाढी/देवशयनी एकादशीचे महत्त्व

असे मानले जाते की आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या उपवासामुळे भगवान विष्णूची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात.

विश्वाचे नियंता आणि पालनकर्ते असं भगवान श्री हरी विष्णू यांना मानले जाते. अशा स्थितीत देवशयनी एकादशीनंतर संपूर्ण चार महिने देव योग निद्रामध्ये जातात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान विष्णू झोपी गेल्यानंतर भगवान शिव ब्रह्मांड चालवण्याची जबाबदारी घेतात, म्हणून चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान शिवाची पूजा करणे विशेषतः फलदायी असते.

आपण आषाढी एकादशी का साजरी करतो?

आषाढी एकादशी हि हिंदू महिन्यात आषाढ (जून-जुलै) मध्ये साजरी केली जाते आणि तिचे फार आध्यात्मिक महत्त्व आहे. असा विश्वास आहे की हा दिवस भक्तिभावाने पाळणे आणि विधीवत पूजा, उपवास केल्याने पाप धुऊन मुक्ती (मोक्ष) प्राप्त होते. वर्षातील सर्व (२४) एकादशींला उपवास नाही केला तर आषाढी एकादशीला उपवास केल्यास भाविकांना पुण्य ल;लाभते असते मानले जाते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. )

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत