लाईफस्टाईल

Thanks की Thank You? चुकीचा शब्दप्रयोग तुमचं इम्प्रेशन बिघडवू शकतो!

आपण रोजच्या गप्पांत सहजपणे Thanks किंवा Thank You म्हणत असतो. दोन्ही शब्दांचा अर्थ ‘आभार मानणं’ हाच असला तरी त्यांच्या वापरातला फरक अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. Thanks हा शब्द हलका, आपुलकी...

Mayuri Gawade

आपण रोजच्या गप्पांत सहजपणे Thanks किंवा Thank You म्हणत असतो. दोन्ही शब्दांचा अर्थ ‘आभार मानणं’ हाच असला तरी त्यांच्या वापरातला फरक अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. इंग्रजीसारख्या जागतिक भाषेत छोटे-छोटे शब्ददेखील संवादाचा सूर ठरवतात. म्हणूनच या दोन शब्दांमागचे बारकावे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

खरं म्हणजे, भाषा केवळ संवादाचं साधन नाही, तर ती नात्यांचा आणि भावनांचा आरसासुद्धा आहे. आपण कोणत्या प्रसंगी कोणता शब्द वापरतो, यावरून आपल्या संवादाची गोडी आणि समोरच्याच्या मनात निर्माण होणारं इम्प्रेशन ठरतं.

Thanks चा वापर कुठे केला जातो?

Thanks हा शब्द हलका, आपुलकी दाखवणारा आहे. मित्राने पेन दिलं, सहकाऱ्याने छोटीशी मदत केली किंवा घरच्यांनी एखादं काम केलं तर आपण पटकन Thanks म्हणतो. म्हणजेच अनौपचारिक वातावरण, जवळची माणसं आणि सहज-संवाद यासाठी हा शब्द योग्य आहे.

Thank You कधी वापरतात?

तर Thank You हे अधिक औपचारिक आणि आदर दाखवणारं वाक्य आहे. शिक्षक, ऑफिसमधले वरिष्ठ, वयाने मोठी माणसं किंवा अनोळखी व्यक्ती यांच्याशी बोलताना “Thank You” म्हंटले तर संवाद जास्त सभ्य आणि नम्र वाटतो. फक्त आभारच नाही तर समोरच्याप्रती आदरही यातून दिसून येतो.

एकूणच, दोन्ही शब्दांचा हेतू एकच, आभार मानणं. पण योग्य ठिकाणी योग्य शब्द निवडला, तर तुमचा संवाद अधिक प्रभावी होतो आणि तुमचं व्यक्तिमत्त्वही अधिक आकर्षक भासू लागतं.

तुम्हाला खुल्या प्रवर्गातील आरक्षण नकोय का? छगन भुजबळ यांचा मराठा नेते, शिक्षित समाजाला सवाल

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल

Nashik Accident : सटाण्याजवळ भीषण अपघातात तीन ठार; मजुरांची पिकअप व्हॅन आणि कारची समोरासमोर टक्कर, १२ जखमी