अॅसिडिटीची समस्या ही अनेकांना आहे. जंक फूड, तिखट पदार्थ खाणे, रिकाम्या पोटी चहा पिणे आणि सतत तळलेले पदार्थ खाल्ल्याने तसेच पुरेशी झोप न घेतल्याने ही समस्या अधिक वाढीला लागते. जेव्हा तुमच्या खाण्याची एक वेळ निर्धारित नसते, तेव्हा सर्वाधिक त्रास अॅसिडिटीची व्हायला लागतो . पोटात जळजळ आणि छातीत दुखणे हे अधिक प्रमाणात दिसून येते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अॅसिडिटी सुरू झाल्यावर पोटात अॅसिड पटकन निर्माण होते आणि पोटातील नाजूक अंगांना यामुळे त्रास होतो आणि नुकसान पोहचते. अॅसिडिटीपासून वाचण्यासाठी नक्की काय करणे आवश्यक आहे, हे आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चहा आणि कॉफीसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांपासून दूर राहावे. याशिवायदेखील ज्यापदार्थांमध्ये कॅफेन असते. ते पदार्थ टाळावेत. तुम्हाला काही प्यावंसं वाटत असल्यास, हर्बल टी अथवा ग्रीन टी चे सेवन करावे. काही ट्रिक्स वापरून तूम्ही अॅसिडीटीपासून पटकन सुटका करून घेऊ शकता.
रिकाम्या पोटी खा 1 सफरचंद
ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी रिकाम्यापोटी एक सफरचंद खाणे हे कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. तुम्ही एक दिवस हे नक्की वापरून पाहा. तुम्हालाच याचा परिणाम लगेच दिसून येईल.
पुदीना अथवा बडिशेप घालून प्या पाणी
अॅसिडिटी न होण्यासाठी नेहमी उकळलेले पाणी अथवा फिल्टर्ड पाणीच प्यावे. तसंच तुम्ही पाणी उकळताना पुदिन्याची पाने त्यात टाकावी आणि हे पाणी थंड करून प्यावे. त्याशिवाय पाण्यात बडिशेप घालून उकळून घ्यावे आणि दिवसभर तुम्ही हे बडिशेपेचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला असिडिटीचा त्रास होत नाही.
मुळ्यामुळे मिळते सुटका
मुळा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे अॅसिडिटीपासून त्वरीत सुटका मिळते. तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही मुळ्याचे काप काढा. त्यावर काळे मीठ आणि काळी मिरी टाका आणि ते खा. तुम्हाला लवकरच यामुळे आराम मिळेल. तुम्हाला हवं असल्यास, मुळ्यामध्ये त्रिफळा चूर्ण घालून तुम्ही खाऊ शकता. यामुळेही तुम्हाला अॅसिडिटीपासून त्वरीत आराम मिळतो.