लाईफस्टाईल

दम्याचा त्रास होतो? खा बहुगुणकारी अळीव

अळीवपासून लाडू, खीर आणि चिवडा असे पदार्थ बनवले जातात. तर जाणून घेऊयात अळीवाचे फायदे

Rutuja Karpe

अळीव म्हणजे काय? बहुतांश भागामध्ये याला हलीम किंवा हळीव या नावाने ओळखलं जातं, लोह, फॉलेट, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन E, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषकघटक अळीवमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय अळीवपासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट असतात. प्रामुख्याने अळीवपासून लाडू, खीर आणि चिवडा असे पदार्थ बनवले जातात. तर जाणून घेऊयात अळीवाचे फायदे खालीलप्रमाणे:-

हिमोग्लोबिन वाढते – अळीवमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिन कमी असल्यास किंवा ऍनिमिया सारखे आजार होतात. यासाठी १ चमचा अळीव दररोजच्या आहारात समाविष्ट करा.

दम्यापासून आराम – फुफ्फुसांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि दम्याचा त्रास कमी होण्यासाठी अळीव खा. कारण यामध्ये जुनाट खोकला आणि घसादुखी कमी होते.

मासिक पाळीच्या तक्रारी दूर – अनियमित मासिक पाळी असल्यास अळीव खा. अळीवमध्ये असणारे फायटोकेमिक हे इस्ट्रोजेन हार्मोन्ससाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.

बाळंतिणीला उपयुक्त – अळीवमध्ये असणारी प्रोटीन, लोह यासारखी पोषकतत्वे बाळंतिणीला पुरेसे दूध येण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आपल्याकडे स्तनपान करणाऱ्या बाळंतिणीला अळीवाचे लाडू, अळीवाची खीर खाण्यास दिली जाते.

पोट साफ होते – अळीवमधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन यासारखा त्रास असल्यास अळीव खाणे उपयुक्त ठरते.

वजन नियंत्रणात राहते – दररोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर हाळीव कोमट पाण्यातून खाल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार