लाईफस्टाईल

बाजारातील कँडीला म्हणा बाय! घरच्या घरी तयार करा हेल्दी फ्रूट Soft Candy

ड्रॅगन फ्रूट आणि जांभळापासून घरच्या घरी बनवा हेल्दी Soft Candy. जाणून घ्या सोपी रेसिपी.

Mayuri Gawade

फळं आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे सगळ्यांनाच माहिती असतं. मात्र घरातील लहान मुलांना फळं खायला देणं हे अनेक पालकांसाठी मोठं आव्हान ठरतं. रोज फळं कापून देणं, ज्यूस किंवा सॅलड बनवून देणं याचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही एक मजेशीर आणि पौष्टिक पर्याय ट्राय करू शकता. ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून घरच्या घरी चविष्ट Soft Candy तयार करता येते. ही कँडी चवीला उत्तम तर असतेच, शिवाय शरीराला आवश्यक पोषकतत्त्वेही मिळवून देते.

ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तर जांभूळ हे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानलं जातं. त्यामुळे ही हेल्दी कँडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडू शकते.

साहित्य

  • १ कप जांभूळ (बिया काढलेले)

  • १ कप ड्रॅगन फ्रूट

  • १ ते २ चमचे शुगर-फ्री स्वीटनर

  • १ चमचा चिया सीड्स

  • १ चमचा लिंबाचा रस

कृती

  • सर्वप्रथम जांभूळ स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून गर वेगळा करून घ्या.

  • ड्रॅगन फ्रूटची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.

  • मिक्सरमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा गर घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  • ही पेस्ट एका पॅनमध्ये काढून त्यात शुगर-फ्री स्वीटनर, चिया सीड्स आणि लिंबाचा रस मिसळा.

  • मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.

  • मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करा.

  • तयार मिश्रण सिलिकॉन मोल्ड किंवा ट्रेमध्ये ओता.

  • फ्रिजमध्ये २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवा.

  • कँडी व्यवस्थित सेट झाल्यावर बाहेर काढा आणि सर्व्ह करा.

फळांचा कंटाळा करणाऱ्या मुलांसाठी ही हेल्दी Soft Candy एक उत्तम पर्याय ठरू शकते. चव आणि आरोग्याचा सुंदर मेळ असलेली ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video