लाईफस्टाईल

नारळ पाणी प्यायल्याने 'हे' होतात फायदे

Rutuja Karpe

नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. आपल्याकडे आजारी माणसाला नारळ पाणी दिलं जातं. नारळ पाणी म्हणजे एक सलाइनची बाटली येवढं गुणकारी असते असं म्हंटले जातं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी नारळ पाणी हे फार फायदेशीर आहे. नारळामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत, नारळामध्ये जास्त प्रमाणात थंडावा असतो. तसेच तहान भागवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो. अलाहादायक थंड पाण्याने आपल्या शरीराची पाण्याची गरज भागवणे याचे काम नारळाचे पाणी करते. तसेच त्याच्यामध्ये काही प्रमाणात मलाई असते. पांढरी मलाई सुद्धा लाभकारक आहे. नारळाचे पाणी जंतुसंसर्गीय नसते. ओल्या नारळामधले पाणी हे गोड तसेच काही प्रमाणात आंबट पण असते.

औषधी उपयोग —

नारळाचे पाणी हे कॉलरा या आजारामध्ये जास्त लाभकारक आहे. कारण त्या काळात जुलाब आणि उलट्या होऊन शरीरातील पाण्याची क्षमता हि पूर्ण कमी झालेली असते. त्यावेळी शरीरात कमी प्रमाणात क्षार उरतात. कमी प्रमाणात निर्माण झालेल्या क्षार मुळे शरीरामध्ये थकवा हा जास्त प्रमाणात जाणवतो. त्या वेळी नारळाचे पाणी पिल्याने शरीरात जे कॉलरा चे जंतू असतात ते सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. कारण नारळाच्या पाण्यात कोणताच जंतू संसर्ग हा नसतो.

नारळाच्या पाण्यात जर तुम्ही लिंबू मिसळले तर त्यावेळी त्याच्यामध्ये असलेले ‘सी’ जीवन सत्वाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. नारळाचे पाणी हि मूत्र साफ करण्यास सुद्धा मदत करते. मूत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात युरीन असते. अश्या वेळी ते शरीरातून बाहेर फेकण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर हा करावा . सर्वात महत्वाचे म्हणजे कोवळ्या नारळाच्या पाण्याचा वापर हा आहारात केला जावा.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस