Summer Special : बाजारासारखे ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम आता घरच्या घरी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : बाजारासारखे ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम आता घरच्या घरी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि चविष्ट ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम. बदाम, काजू, पिस्ता आणि केशराच्या चवीने भरलेली ही सोपी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात थंडगार आणि चविष्ट काहीतरी खाण्याची इच्छा झाली की आईस्क्रीम हा पहिला पर्याय ठरतो. मात्र, बाजारातील आईस्क्रीमऐवजी घरच्या घरी बनवलेले ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम अधिक हेल्दी, क्रीमी आणि चविष्ट ठरू शकते. बदाम, काजू, पिस्ता आणि केशराच्या सुगंधाने भरलेले हे ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी अतिशय सोपी असून कमी साहित्यामध्ये घरच्या घरी सहज तयार करता येते.

साहित्य :

  • १ कप थंड दूध

  • १ कप फ्रेश क्रीम

  • १/२ कप कंडेन्स्ड मिल्क

  • २-३ मोठे चमचे बारीक कापलेले किंवा कुटलेले ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ता)

  • १/२ छोटा चमचा वेलची पावडर

  • थोडे केशराचे दूध (केशर भिजवलेले दूध)

कृती :

सर्वप्रथम एका मिक्सरमध्ये थंड दूध, फ्रेश क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण छान स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढा.

आता त्यामध्ये बारीक चिरलेले किंवा कुटलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि केशराचे दूध घाला. सर्व साहित्य चमच्याने हलक्या हाताने नीट एकजीव करून घ्या.

तयार मिश्रण एअरटाइट डब्यात काढा आणि वरून थोडे ड्रायफ्रुट्स पसरवा. हा डबा ५ ते ६ तासांसाठी किंवा पूर्ण सेट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवा.

आईस्क्रीम पूर्ण सेट झाल्यानंतर स्कूप करून सर्व्ह करा. वरून केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून सजवल्यास चव अधिक छान लागते.

टिप्स :

  • आईस्क्रीम अधिक क्रीमी हवे असल्यास मिश्रण एकदा ब्लेंड केल्यानंतर २ तासांनी पुन्हा हलके फेटून फ्रीज करा.

  • अधिक रिच चव हवी असल्यास थोडे खवा किंवा मिल्क पावडर घालू शकता.

  • साखर वेगळी घालण्याची गरज नाही, कंडेन्स्ड मिल्कमुळे पुरेसा गोडवा मिळतो.

  • केशरामुळे आईस्क्रीमला सुंदर रंग आणि खास सुगंध मिळतो.

  • सर्व्ह करताना वरून मध किंवा ड्रायफ्रुट क्रश घातल्यास चव आणखी छान लागते.

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

"फक्त रीलमध्ये माफ करणार की गुन्हेही मागे घेणार?"; पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचा सवाल

मुंबई-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा! नव्या दैनंदिन एक्सप्रेसला मंजुरी; 'या' स्थानकांवर थांबणार

आजपासून बदलले अनेक महत्त्वाचे नियम! LPG सिलिंडरपासून रेल्वे तिकीट, बँकिंगपर्यंत जाणून घ्या नवे अपडेट्स

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर