Easter Special Recipe : ईस्टरला खास गोड पदार्थ; घरच्या घरी बनवा टेस्टी कॅरट केक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Easter Special Recipe : ईस्टरला खास गोड पदार्थ; घरच्या घरी बनवा टेस्टी कॅरट केक

ईस्टर सणासाठी खास गाजराचा (कॅरट) केक घरच्या घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या.

किशोरी घायवट-उबाळे

ईस्टर सणानिमित्त घराघरांत गोड पदार्थांची रेलचेल असते. या खास दिवशी 'कॅरट केक' म्हणजेच गाजराचा केक हा आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय मानला जातो. गाजरातील नैसर्गिक गोडवा आणि केकचे टेक्स्चर यामुळे हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. ईस्टरच्या आनंदात भर घालण्यासाठी हा कॅरट केक नक्की करून पाहा.

साहित्य :

  • किसलेले गाजर - २ कप

  • मैदा - दीड कप

  • साखर - १ कप

  • तेल (किंवा बटर) - अर्धा कप

  • अंडी - २

  • बेकिंग पावडर - १ टीस्पून

  • बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून

  • दालचिनी पावडर - १ टीस्पून

  • व्हॅनिला इसेन्स - अर्धा टीस्पून

  • मीठ - चिमूटभर

  • चिरलेले ड्रायफ्रूट्स (अक्रोड/काजू) - पाऊण कप

कृती :

सर्वप्रथम ओव्हन १८०°C वर प्रीहीट करून घ्या. एका भांड्यात अंडी आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात तेल किंवा वितळलेले बटर घालून मिश्रण चांगले हलवा. यानंतर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि किसलेले गाजर घालून पुन्हा एकजीव करा. दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि मीठ चाळून घ्या.

हे कोरडे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा. शेवटी त्यात ड्रायफ्रूट्स घालून हलक्या हाताने मिक्स करा. तयार बॅटर ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये ओता. ओव्हनमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करा. केक शिजला आहे का, हे तपासण्यासाठी टूथपिक घालून पाहा. केक थंड झाल्यावर बाहेर काढून सर्व्ह करा.

टिप्स :

  • केक अधिक मऊ आणि स्वादिष्ट करण्यासाठी बटर वापरू शकता.

  • गाजर नीट बारीक किसलेले असावे, त्यामुळे टेक्स्चर चांगले येते.

  • वरून क्रीम चीज फ्रॉस्टिंग लावल्यास केक अधिक टेस्टी लागतो.

  • हेल्दी पर्यायासाठी साखरेऐवजी ब्राउन शुगर वापरू शकता.

ईस्टरच्या निमित्ताने हा गाजराचा केक घरच्यांसोबत आनंदात जरूर ट्राय करा.

LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज

Nashik : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर

Mumbai : 'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video

Mumbai Metro 9: अखेर प्रतीक्षा संपली! दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ६ एप्रिलपासून होणार सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

Thane : घोडबंदर-वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह; 'आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणार