लाईफस्टाईल

कंटाळवाण्या नाश्त्याला गुडबाय! ट्राय करा ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी - ‘उत्तपम’

रोज रोज तोच नाश्ता करून कंटाळा आलाय का? मग आता वेळ आलीये चव आणि आरोग्याचा भन्नाट संगम अनुभवायची!

Mayuri Gawade

नाश्ता म्हटलं की कांदेपोहे, शिरा, उपमा हेच डोळ्यासमोर येतात आणि खरं सांगायचं तर हे सगळे पदार्थ चविष्ट असले तरी रोज रोज खाल्ले की चवीतली मजा हरवते. कधी कधी नाश्त्यात काहीतरी हटके, वेगळ्या चवीचं आणि पौष्टिक खाल्लं की दिवसाची सुरुवातच एकदम खास होते आणि मूडही ताजा होतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काहीतरी हटके- ऑइल-फ्री, हेल्दी आणि टेस्टी उत्तपम जो तुमच्या सकाळी मस्त नवा ट्विस्ट देईल.

साहित्य -

2 वाटी रवा

1 वाटी दही किंवा ताक

1 चारीक चिरलेला कांदा

1 बारीक चिरलेली शिमला मिरची

1 टोमॅटो, 100 ग्रॅम पनीर

1 काकडी, हिरव्या मिरच्या

बारीक चिरलेली कोथिंबीर

तेल किंवा तूप (ऐच्छिक)

मीठ

कृती -

सर्वप्रथम रवा एका भांड्यात घ्या. त्यात ताक किंवा दही मिसळा आणि अर्धा तास झाकून ठेवा. नॉनस्टिक तव्यावर हलकंसं तेल किंवा तूप लावून तयार केलेला रव्याचा घोळ पसरवा. वर कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पनीर आणि काकडीचे काप मांडून घ्या. त्यावर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ भुरभुरवा. इच्छा असल्यास वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडा. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या.

गरमागरम उत्तपम तयार! हिरव्या चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा आणि नाश्त्याचा मस्त ट्विस्ट अनुभवून बघा.

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे

‘INS विक्रांत’ने पाकची झोप उडवली! नौदल कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करीत मोदींनी केले नौदलाचे कौतुक

कफ परेडमधील मच्छिमार नगर परिसरात अग्नितांडव; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी