शरीर निरोगी राहण्यासाठी जशी सकस आणि पौष्टिक आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे मेंदूचे कार्य चांगले रहावे यासाठी मेंदुलाही अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता आहे. तसेच हिवाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केल्याने मेंदू सुधारण्यास मदत होते.
आपला मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्याला विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती मेंदू देतो. जाणून घेऊया मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात. हे सगळे पोषक घटक मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, आणि गाजर यासारख्या भाज्यां मेंदूच्या
पेशींचे संरक्षण करणारे अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
अंड्यांमध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व असते. त्यामुळे मेंदूच्या पेशींची वाढ आणि कार्य सुधारते.
हे न्यूरोट्रांसमीटर म्हणून काम करते. अंड्यांमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात.
ज्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. तसेच हिवाळ्यात अंडी जरूर खावीत.
दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी
सारखे पोषक घटक असतात. जे मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक असतात.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.