लाईफस्टाईल

हिवाळ्यात भिजवलेले अंजिर खा, शरीराला होतात भरपुर फायदे

भिजवलेले अंजिर हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. चला जाणून घेऊ या अंजीरचे चमत्कारिक फायदे.

Rutuja Karpe

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अंजिर खाल्ल्याने शरीरात उब तयार होते. रात्री दूधात भिजवून खाल्ल्याने आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. भिजवलेले अंजिर हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. चला जाणून घेऊ या अंजीरचे चमत्कारिक फायदे. 

१. अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात डायट फायबर असतात. हे पचन संस्थेला ठीक करते. यामुळे पोट पण साफ होते. यासाठी रात्री दोन ते अंजीर पाण्यात भिजुन ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खा. याने कब्ज, एसिडिटी, गॅस, मुळव्याध तसेच ब्लोटिंगची समस्या दूर होतात.

२. अंजीरात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. अंजीर खाल्ल्याने हाडांचे दुखणे बरे होते आणि शरीरातील हाडे मजबूत बनतात.

३. अंजीर खाल्ल्याने अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो आणि रक्त वाढते. या अ‍ॅनिमिया सारख्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी वाळलेल्या अंजीरपेक्षा चांगले काहीच नाही. अंजीरच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबींचा स्तर वाढतो.

४. अंजीर रक्तदाबाला पण नियंत्रित ठेवते. अंजीरमध्ये फायबर आणि पोटॅशिअम असते जे उच्च रक्तदाबाच्या संभावनेला कमी करते.

५. अंजीरचे टाकून दूध पिल्याने इम्युनिटी स्ट्रांग होते. याच्या सेवनाने बदलत्या वातावरणाचे आजार होत नाही. सर्दी, खोकला, ताप तसेच ठंडी मध्ये हाडांमध्ये आणि गूडग्यान मध्ये जास्त प्रमाणात दुखते. यासाठी रोज एक ग्लास दुधात अंजीर टाकून घेणे. यामुळे हाडांचे दुखणे येणार नाही व हाडे मजबूत होतील.

६. वाळलेल्या अंजीरला उकळवून चांगले बारिक करुन गळ्याला आलेल्या सुजवर किंवा गाठ यावर बांधले तर लवकर आराम मिळतो.

७. मधुमेह असल्यास अन्य फळांच्या तुलनेत अंजीरचे सेवन विशेष लाभकारी असते.

८. कुठल्याही प्रकारचा बाह्य पदार्थ पोटात गेला तर त्याला बाहेर काढण्यासाठी अंजीर अधिक मात्रा मध्ये सेवन करने उपयोगी असते. 

९. क्षयरोग, दमा, अस्थमा या रोगांमध्ये प्रत्येक वेळी अंजीरचे सेवन पथ्यकारक मानले जाते.

१०. ताजे अंजीर खाउन वरुन दूध पिणे हे अत्यंत शक्तिवर्धक तसेच वीर्यवर्धक मानले जाते.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास