डोकं शांत राहतं. तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी. PM
लाईफस्टाईल

केस गळताय? तर मग 'या' पदार्थांचे सेवण करणे टाळाचं!

आपल्या खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे केस गळतात, त्यामुळे कोणते पदार्थांच्या सेवनामुळे केस गळती होऊ शकते जाणून घेवूयात.

Rutuja Karpe

वाढते प्रदूषण, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे केस गळण्याची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. बाजारात या समस्येवर अनेक प्रॉडक्ट, औषधे आहेत परंतु त्यांचा मनासारखा परिणाम होत नाही, शिवाय वाईट परिणामांची भीती असते. आपल्या खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे सुद्धा केस गळतात, हे पदार्थ कोणते जाणून घेवूयात.

1. गोड पदार्थ खाणे
तुम्हाला जास्त गोड पदार्थ खाण्याची आवड असेल तर हे तुमच्या केसांसाठी हानिकारक ठरते. जास्त गोड खाण्याचा आरोग्यावरही वाईट परीणाम होतो. इन्सुलिन रेजिस्टन्स, ज्यामुळे डायबिटिज आणि लठ्ठपणा सारख्या समस्या निर्माण होतात, यामुळे महिला आणि पुरूषांमध्ये टक्कलाची समस्या होऊ शकते. जास्त प्रमाणात साखर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खात असाल तर यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स समस्या होते.

2. डाएट सोडा
फिटनेसची आवड असणार्‍यांमध्ये डाएट सोडाचे प्रमाण वाढले आहे. परंतु जास्त प्रमाणात याचे सेवन केले तर केस गळतीची समस्या होऊ शकते.

3. अंड्याचा पांढरा भाग
अंडे केसांच्या मजबूतीसाठी चांगले आहे, परंतु ते कच्चे खाऊ नये. अंड्याचा कच्चा भाग खाल्ल्याने शरीरात बायोटिनची कमतरता होते, बायोटिन केस बनवणारे प्रोटीन, केरोटिनच्या निर्मितीत उपयोगी पडते.

4. जंक फूड
जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे गेस गळती वाढते. यामुळे DHT हार्मोनचा स्तर वाढतो. या हार्मोनचा स्तर शरीरा वाढल्याने टकलाची समस्या होऊ शकते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने डोक्याची त्वचा सुद्धा तेलकट होते, ज्यामुळे केसांची रोम छिद्र बंद होऊ शकतात.

5. दारू
आपले केस केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. दारू प्रोटीन-संश्लेषणावर चुकीचा प्रभाव टाकते. यामुळे केस कमजोर होतात आणि तुटू लागतात. जास्त दारू प्यायल्याने शरीरात पोषक तत्वांची सुद्धा कमतरता निर्माण होऊ लागते. यामुळे केस गळतीची समस्या होते.

6. मासे
मागील काही वर्षापासून जलवायु परिवर्तनामुळे माशांमध्ये पार्‍याचे प्रमाण वाढले आहे. हा पारा माशांच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या आत पोहचतो. शरीरात जर पार्‍याची मात्रा जास्त झाली तर केस गळण्यास सुरूवात होते. यासाठी माशांचे सेवन खुप जास्त करू नये.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर

राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

जनसुरक्षावरून काँग्रेस आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी नाराज; विधिमंडळ पक्षाला स्पष्टीकरणाचे आदेश

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; २४ हजार कोटी रुपये खर्च होणार