(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

हातांची बोटं मोडण्याची सवय ठरू शकते घातक; वेळीच सावध व्हा! तज्ज्ञ सांगतात...

सवय दीर्घकाळ टिकली तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. तुम्हालाही बोटे मोडायची सवय असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

किशोरी घायवट-उबाळे

काम करताना, तणावात असताना किंवा सवयीने अनेक जण हातांची बोटं सतत मोडतात. काहींना यामुळे रिलॅक्स वाटतं, तर काहींना ही सवय नकळत लागलेली असते. पण ही सवय दीर्घकाळ टिकली तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. तुम्हालाही बोटं मोडायची सवय असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

बोटं मोडण्याची सवय नेमकी का लागते?

मानसिक तणाव किंवा चिंता, कंटाळा किंवा अस्वस्थपणा, सवयीचा भाग (Habitual Behavior), हातात जडपणा किंवा कडकपणा जाणवणे या गोष्टींमुळे सतत बोटं मोडण्याची सवय लागते.

तज्ज्ञांच्या मते, सतत बोटं मोडण्यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात :

१. सांध्यांवर ताण

वारंवार बोटं मोडल्याने सांध्यांवर अनावश्यक दबाव येतो, ज्यामुळे वेदना किंवा सूज निर्माण होऊ शकते.

२. सांध्यांची हालचाल कमी होणे

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ ही सवय राहिल्यास बोटांची पकड (Grip Strength) कमी होण्याची शक्यता असते.

३. संधिवाताचा धोका

थेट संधिवात होतोच असे ठोस संकेत नसले, तरी आधीपासून सांध्यांच्या समस्या असतील तर त्रास वाढू शकतो.

४. मानसिक आरोग्याचा संकेत

ही सवय अनेकदा तणाव, चिंता किंवा नर्व्हसनेस याचं लक्षण असू शकते.

बोटे मोडण्याची सवय कशी सोडायची?

  • तणाव कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करा.

  • हातांसाठी स्ट्रेचिंग आणि एक्सरसाईज करा.

  • बोटे मोडण्याची इच्छा झाली की हातात स्ट्रेस बॉल घ्या.

  • सवय जास्त वाढली असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

बोटं मोडणं क्षणिक आराम देऊ शकतं, पण सतत आणि जाणीवपूर्वक ही सवय ठेवणं योग्य नाही. वेळेत लक्ष दिलं, तर भविष्यातील त्रास टाळता येऊ शकतो.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके