

आज (दि.१) संसदेत २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीमा शुल्कात दिलेल्या सवलतींमुळे मायक्रोवेव्ह ओव्हनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे घरगुती ग्राहकांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करणे आता अधिक परवडणारे ठरणार आहे.
मात्र, स्वस्त झाल्यामुळे घाईघाईत मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य निवड केली तर हे उपकरण दीर्घकाळ उपयोगी ठरेल आणि वीज व दुरुस्तीचा खर्चही कमी येईल.
मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?
प्रकार निवडा : सोलो, ग्रिल आणि कन्वेक्शन असे मायक्रोवेव्हचे प्रकार असतात. केवळ गरम करण्यासाठी हवे असेल तर सोलो आणि बेकिंग-ग्रिलिंगसाठी कन्वेक्शन ओव्हन योग्य ठरतो.
क्षमता (Capacity) : कुटुंबातिला सदस्यांच्या संख्येनुसार क्षमता ठरवा. २ ते ३ सदस्यांसाठी २० ते २५ लीटर, तर मोठ्या कुटुंबासाठी २८ ते ३२ लीटर क्षमतेचा ओव्हन उपयुक्त असतो.
वीज वापर (Power Consumption) : ऊर्जा कार्यक्षम (Energy Efficient) मायक्रोवेव्ह निवडल्यास वीजबिलावर कमी भार पडतो.
सुरक्षित वैशिष्ट्ये : चाइल्ड लॉक, ऑटो शट-ऑफ आणि हीट प्रोटेक्शनसारखी फीचर्स असणे महत्त्वाचे आहे.
आतील कोटिंग (Interior Coating) : सिरेमिक किंवा स्टेनलेस स्टील कोटिंग असलेला ओव्हन स्वच्छ ठेवणे सोपे जाते त्यामुळे तो जास्त काळ टिकतो.
वॉरंटी आणि सर्व्हिस: ब्रँडची वॉरंटी, सर्व्हिस सेंटर उपलब्धता आणि दुरुस्ती खर्च आधीच तपासून घ्या.
बजेट आणि गरज यांचा समतोल : स्वस्त किंमत पाहून जास्त फीचर्सचा ओव्हन घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वापर लक्षात घेऊन योग्य मॉडेलची निवड करा.
यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होणार असले तरी, योग्य माहिती घेऊन खरेदी केली तर त्याचा खरा फायदा ग्राहकांना मिळू शकतो.