Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात नारळ पाण्यात 'हा' पदार्थ एकत्रित करून प्या; वजन कमी करण्यासह मिळतील अन्यही अनेक फायदे

उन्हाळ्यात अनेक कारणांमुळे आपले शरीर सातत्याने डिहायड्रेटेड होत असते. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या शरिराला आराम देण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेय पदार्थांचे सेवन करतो. नारळ पाणी हे देखील त्यापैकीच एक आहे. नारळ पाणी पिण्याचे शरिराला अनेक फायदे होतात. तसेच हे एक नैसर्गिक पेय असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही.

Kkhushi Niramish

उन्हाळ्यात अनेक कारणांमुळे आपले शरीर सातत्याने डिहायड्रेटेड होत असते. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या शरिराला आराम देण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेय पदार्थांचे सेवन करतो. नारळ पाणी हे देखील त्यापैकीच एक आहे. नारळ पाणी पिण्याचे शरिराला अनेक फायदे होतात. तसेच हे एक नैसर्गिक पेय असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. नारळ पाण्यासोबत तुम्ही जर Ash gourd अर्थात पांढरा भोपळा एकत्रिक करून घेतले तर याचे अचंबित करणारे फायदे तुम्हाला मिळतात. पांढऱ्या भोपळ्याला काही भागात पेठा असेही म्हणतात.

पांढऱ्या भोपळ्याची भाजी खूप चविष्ट लागते. तसेच हा पांढरा भोपळा अनेक प्रकारच्या स्वादिष्ट मिठाई बनवण्यासाठी देखील उपयोग केला जातो. आयुर्वेदानुसार पांढरा भोपळा हा पित्त आणि वात दोष शांत करणारा आहे. तसेच याचे आरोग्याला अनेक लाभ होतात.

नारळ पाणी आणि पांढरा भोपळा एकत्रित करून याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे होतात.

शरीर हायड्रेटेड राहते

पांढऱ्या भोपळ्यात जवळपास ९६ टक्के पाणी असते. तर नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट मानले जाते. त्यामुळे नारळ पाणी आणि पांढऱ्या भोपळ्याचा रस एकत्र करून घेतल्यास तुमचे शरीर चांगले हायड्रेटेड राहते.

वजन घटवणे

नारळ पाणी आणि पांढरा भोपळा दोघांमध्येही कार्ब आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच हे पेय प्यायल्यानं शरिराला आवश्यक त्या ऊर्जेचा पुरवठा होतो. अशक्तपणा दूर होतो.

त्वचा चमकदार होते

या पेयामुळे पेशींमध्ये हायड्रेशन होते. तसेच रक्त-ऑक्सीजनच्या फ्लोमध्ये सुधारणा होते. यामुळे त्वचेला पोषण मिळते. नारळपाणी त्वचेला चमकदार बनवते.

पचनशक्ती चांगली होते

नारळ पाणी शरिराला थंड ठेवते. पांढऱ्या भोपळ्यात फाइबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुरळीत झाल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video