Freepik
लाईफस्टाईल

महिलांमध्ये Anemia होण्याचे प्रमाण का आहे जास्त? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Anemia हा रक्ताशी संबंधित आजार आहे. यामध्ये शरीरात लाल रक्तपेशी अर्थात RBCs किंवा हिमोग्लोबीनची कमतरता होते. परिणामी शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. तसेच थकवा, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे ही याची महत्त्वाची लक्षणे असून याशिवाय चेहऱ्यावरील चमकही कमी होते, केस गळण्याचे प्रमाण वाढते, ओठांचा रंगही काळपट होतो. Anemia ची समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त आढळते.

Kkhushi Niramish

Anemia हा रक्ताशी संबंधित आजार आहे. यामध्ये शरीरात लाल रक्तपेशी अर्थात RBCs किंवा हिमोग्लोबीनची कमतरता होते. परिणामी शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. तसेच थकवा, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे ही याची महत्त्वाची लक्षणे असून याशिवाय चेहऱ्यावरील चमकही कमी होते, केस गळण्याचे प्रमाण वाढते, ओठांचा रंगही काळपट होतो. Anemia ची समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त आढळते. जाणून घ्या महिलांना Anemia का होतो? कारणे आणि उपाय...

महिलांमध्ये Anemia जास्त प्रमाणात असण्याची कारणे

महिलांमध्ये Anemia होण्याची कारणे अनेक आहेत. मात्र काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे सांगता येतील.

लोहाची कमतरता

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त लोहाची आवश्यकता असते. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव झाल्यामुळे लोहाचे नुकसान होते. गर्भधारणेदरम्यान, बाळाच्या विकासासाठी अधिक लोहाची आवश्यकता असते. स्तनपान देणाऱ्या महिलांनाही कमतरता जाणवू शकतात. मात्र, अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांमध्ये लोहाची कमतरता जाणवते. यामध्ये वेळेवर जेवण न करणे, चुकीची आहारशैली, आरोग्याप्रती निष्काळजीपणा इत्यादींमुळे लोहाची कमतरता जाणवते.

कुपोषण

अनेकदा कुपोषणामुळे लोहयुक्त आहार (हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, मांस, अंडी) घेतला जात नाही. त्यामुळे Anemia होऊ शकतो.

व्हिटॅमीन बी १२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता

लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे Anemia होऊ शकतो.

पचन समस्या

कृमींमुळे (आतड्यांतील कृमींमुळे) पोषक तत्वांचे शोषण शक्य होत नाही. अल्सर किंवा संसर्गासारख्या जठरासंबंधी समस्यांमुळे अशक्तपणा येऊ शकतो.

Anemia ची प्रमुख लक्षणे

थकवा आणि अशक्तपणा

डोकेदुखी आणि चक्कर येणे

त्वचा पिवळी पडणे

श्वास घेण्यात अडचण

Anemia होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल

संतुलित आहार

आहारावर लक्ष केंद्रीत केल्यास Anemia सहज दूर होऊ शकतो. त्यासाठी आहाराचे व्यवस्थित नियमन करायला हवे.

लोहयुक्त पदार्थांचे सेवन

आहारात पालक, मेथी, बीट, डाळिंब, डाळी, अंडी, मासे यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल.

व्हिटॅमिन सी युक्त आहार घेणे

शरीरात लोहाची उणीव भरून काढण्यासाठी ज्याप्रमाणे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. तसेच व्हिटॅमिन सी युक्त आहार घेणेही महत्त्वाचे आहे. कारण व्हिटॅमिन सी युक्त आहार अन्नातून लोहाचे शोषण करण्यास मदत करते. संत्री, लिंबू, आवळा खाल्ल्याने लोहाचे शोषण वाढते आणि शरीराला लोहाची पूर्तता होते.

नियमित तपासणी

महिलांनी आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमितपणे हिमोग्लोबिन चाचणी करणे आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप