उन्हाळ्यातील खास पेय! घरीच बनवा शुगर-फ्री मँगो लस्सी; जाणून घ्या रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

उन्हाळ्यातील खास पेय! घरीच बनवा शुगर-फ्री मँगो लस्सी; जाणून घ्या रेसिपी

साखर न घालता, नैसर्गिक गोडवा वापरूनही चविष्ट आणि पौष्टिक मँगो लस्सी घरच्या घरी तयार करता येते. ही हेल्दी लस्सी चविष्ट, क्रीमी आणि उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा म्हटलं की थंडगार पेयांची आठवण येते. मँगो लस्सी हा सगळ्यांचा आवडता पेय प्रकार असला, तरी त्यात साखर जास्त असते. पण आता साखर न घालता, नैसर्गिक गोडवा वापरूनही चविष्ट आणि पौष्टिक मँगो लस्सी घरच्या घरी तयार करता येते. ही हेल्दी लस्सी चविष्ट, क्रीमी आणि उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे.

साहित्य :

  • मोठा पिकलेला आंबा (चिरलेला) - १

  • साधं दही किंवा ग्रीक योगर्ट - १ कप

  • मऊ खजूर (बिया काढून) - २

  • थंड पाणी - ¼ कप

  • बर्फाचे तुकडे - ४ ते ५

  • वेलदोडा पूड - ¼ टीस्पून

  • १० मिनिटे भिजवलेले चिया सीड्स (ऐच्छिक) - १ टीस्पून

  • चिरलेले पिस्ते - सजावटीसाठी

कृती :

ब्लेंडरमध्ये आंबा, दही/ग्रीक योगर्ट, खजूर, थंड पाणी, बर्फ आणि वेलदोडा पूड घाला. हे मिश्रण १ ते २ मिनिटे छान ब्लेंड करा, जेणेकरून ते स्मूद आणि क्रीमी होईल. चव पाहून गोड कमी वाटल्यास अजून १ खजूर घालू शकता. भिजवलेले चिया सीड्स घालून हलक्या हाताने मिक्स करा. तयार लस्सी ग्लासमध्ये ओता आणि वरून पिस्ते घालून सजवा. थंडगार सर्व्ह करा.

टिप्स :

  • गोड आणि रसाळ आंबा वापरल्यास चव अधिक छान येते.

  • दही ताजं आणि थंड असावं.

  • साखर टाळून खजूर वापरणं अधिक हेल्दी पर्याय आहे.

  • जाडसर टेक्सचरसाठी ग्रीक योगर्ट वापरा.

  • लगेच सर्व्ह केल्यास चव आणि फ्रेशनेस टिकतो.

फायदे :

  • आंब्यात व्हिटॅमिन C आणि A असतात, जे त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात.

  • दही/ग्रीक योगर्टमुळे प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं.

  • खजूर नैसर्गिक गोडवा देतात आणि फायबरही देतात.

  • चिया सीड्समुळे फायबर वाढतं आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

  • साखर न वापरल्यामुळे हे पेय अधिक हेल्दी ठरतं.

साखर न वापरता तयार केलेली मँगो लस्सी हा उन्हाळ्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. चविष्ट, क्रीमी आणि हेल्दी असल्यामुळे हे पेय घरच्यांसाठी नक्की ट्राय करा.

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता