सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय! घरच्या घरी बनवा पालक पनीर उत्तपम 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय! घरच्या घरी बनवा पालक पनीर उत्तपम

पालकातील पोषक घटक, पनीरमधील प्रोटीन आणि रव्याची हलकी चव यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

दररोज नाश्त्यात काय बनवायचं हा अनेक गृहिणींसमोरचा मोठा प्रश्न असतो. अशावेळी चविष्ट, पौष्टिक आणि पटकन तयार होणारा पदार्थ मिळाला तर दिवसाची सुरुवात आणखी खास होते. जर तुम्हालाही हेल्दी आणि वजन नियंत्रणात ठेवणारा नाश्ता हवा असेल, तर पालक पनीर उत्तपम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पालकातील पोषक घटक, पनीरमधील प्रोटीन आणि रव्याची हलकी चव यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य :

  • १ कप पालक प्युरी

  • १ कप रवा

  • अर्धा कप दही

  • १ पाकीट फ्रूट सॉल्ट

  • चवीनुसार मीठ

  • अर्धा कप किसलेलं पनीर

  • अर्धा कांदा (बारीक चिरलेला)

  • अर्धा टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • १ टीस्पून हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

  • १ टेबलस्पून कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यामध्ये दही, मीठ आणि पालक प्युरी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून बॅटर तयार करा आणि काही मिनिटं बाजूला ठेवा.

यानंतर एका वेगळ्या भांड्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेलं पनीर आणि चिमूटभर मीठ घालून टॉपिंग तयार करा. आता बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट आणि थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करा. त्यामुळे उत्तपम अधिक मऊ आणि फुललेले होतील.

तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावा. त्यानंतर एक मोठा चमचा बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवा. वरून तयार केलेलं टॉपिंग घालून हलकं दाबा. उत्तपम एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम पालक पनीर उत्तपम हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक पौष्टिक बनवण्यासाठी बॅटरमध्ये किसलेलं गाजर किंवा बीटही घालू शकता.

  • वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर कमी तेलात उत्तपम भाजा.

  • मुलांना आवडण्यासाठी वरून थोडंसं चीजही घालू शकता.

  • बॅटर खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके