(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

हिवाळ्यात खा पौष्टिक नाचणीचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

जर तुम्हाला रोजच्या पोळीऐवजी काही वेगळं, चविष्ट आणि हेल्दी खायचं असेल, तर नाचणीचे पराठे हा उत्तम पर्याय आहे. हे पराठे रुचकर तर असतातच शिवाय थंडीमध्ये ते शरीराला ऊर्जाही देतात.

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्यात शरीराला उब देणारे आणि ताकद वाढवणारे पदार्थ खाणे महत्त्वाचे असते. अशाच पौष्टिक धान्यांपैकी एक म्हणजे नाचणी. कॅल्शियम, फायबर आणि आयर्नने भरलेली नाचणी हिवाळ्यात विशेष फायदेशीर ठरते. जर तुम्हाला रोजच्या पोळीऐवजी काही वेगळं, चविष्ट आणि हेल्दी खायचं असेल, तर नाचणीचे पराठे हा उत्तम पर्याय आहे. हे पराठे रुचकर तर असतातच शिवाय थंडीमध्ये ते शरीराला ऊर्जाही देतात.

साहित्य :

  • १ कप नाचणी पीठ

  • अर्धा कप गव्हाचे पीठ

  • १ कांदा (बारीक चिरलेला)

  • १ ते २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • २ टेबलस्पून कोथिंबीर (चिरलेली)

  • अर्धा टीस्पून जिरे

  • अर्धा टीस्पून हळद

  • चवीनुसार मीठ

  • गरजेनुसार पाणी

  • पराठे भाजण्यासाठी तेल / तूप

कृती :

एका परातीत नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, हळद आणि मीठ घाला. थोडं-थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर पीठाचे गोळे करून पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून पराठे सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. गरमागरम नाचणीचे पराठे तयार!

टीप :

  • नाचणीचे पीठ कोरडं असल्याने पीठ फार घट्ट करू नका.

  • चव वाढवण्यासाठी किसलेलं आलं किंवा लसूण घालू शकता.

  • हे पराठे लोणी, दही किंवा घरगुती चटणीसोबत खूप छान लागतात.

  • मधुमेह असणाऱ्यांसाठीही नाचणी उपयुक्त मानली जाते.

Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

Bhiwandi : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार