(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

Holi 2026 : होळी स्पेशल ड्रायफ्रूट्स थंडाई; पाहुण्यांसाठी परफेक्ट ड्रिंक, नोट करा रेसिपी

पाहुणचारासाठी आणि कुटुंबासोबत होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी बनवलेली थंडगार थंडाई हा उत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या होळी स्पेशल पारंपरिक थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

होळी हा रंग, आनंद आणि उत्साहाचा सण मानला जातो. या दिवशी रंग खेळल्यानंतर शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणाऱ्या पेयांची विशेष गरज असते. त्यामुळे होळीच्या सणात 'थंडाई'ला खास महत्त्व आहे. बदाम, पिस्ते, खसखस, गुलाब आणि केशर यांसारख्या पौष्टिक घटकांनी तयार होणारी थंडाई शरीराला थंडावा देण्यासोबतच ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. पाहुणचारासाठी आणि कुटुंबासोबत होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी बनवलेली थंडगार थंडाई हा उत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या होळी स्पेशल पारंपरिक थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • फुल क्रीम दूध - अर्धा लिटर

  • बदाम (गरम पाण्यात भिजवून सोललेले) - २५ ते ३०

  • पिस्ते (भिजवून सोललेले) - ४ टेबलस्पून

  • खसखस (३ ते ४ तास भिजवलेली) - ३ टेबलस्पून

  • मगज (कलिंगडाच्या बिया, भिजवलेल्या) - ३ टेबलस्पून

  • काजू (भिजवलेले) - २०

  • हिरवी वेलची - ४ ते ५

  • काळी मिरी - ८ ते १०

  • सुकलेल्या गुलाब पाकळ्या - २० ते २५

  • दालचिनी - १ इंच

  • थोडे केशर

  • साखर - दीड कप

  • बदाम-पिस्त्याचे काप - सजावटीसाठी

कृती :

एका खोल पॅनमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवा. एका मिक्सरच्या भांड्यात बदाम, पिस्ते, खसखस, मगज आणि काजू घेऊन यांची २ ते ३ टेबलस्पून कोमट दूध घालून बारीक पेस्ट तयार करा. वेलची, काळी मिरी, गुलाब पाकळ्या आणि दालचिनी एकत्र करून त्याची बारीक पूड तयार करा. त्यानंतर दूध उकळायला लागल्यावर त्यात केशर आणि साखर घाला व साखर विरघळेपर्यंत ढवळा. तयार ड्रायफ्रूट्सची पेस्ट दूधात घालून २ ते ३ मिनिटे शिजवा. त्यानंतर मसाल्याची पूड (हिरवी वेलची, काळी मिरी, दालचिनी) घालून १ ते २ मिनिटे शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर भांड्यात काढून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. सर्व्ह करताना बदाम-पिस्त्याचे काप घालून थंडगार थंडाई सर्व्ह करा.

टिप्स :

  • होळीच्या दिवशी सर्व्ह करण्यासाठी थंडाई आधीच बनवून फ्रिजमध्ये ठेवा.

  • अधिक चांगल्या चवीसाठी केशर आणि गुलाब पाकळ्या नक्की वापरा.

  • साखरेऐवजी खडीसाखर किंवा गूळ वापरल्यास अधिक पौष्टिक ठरते.

  • ड्रायफ्रूट्स चांगले भिजवल्यास थंडाई अधिक क्रीमी आणि चविष्ट बनते.

  • थंडाई सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रूट्स घातल्यास आकर्षक दिसते.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण