महागडं खत नकोच! स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांनी कुंडीतली रोपं राहतील टवटवीत 
लाईफस्टाईल

Home Gardening Tips : महागडं खत नकोच! स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांनी कुंडीतली रोपं राहतील टवटवीत

कुंडीतली रोपं टवटवीत आणि हिरवीगार ठेवण्यासाठी महागड्या खतांची गरज नाही. स्वयंपाकघरातील साध्या पदार्थांचा वापर करूनही रोपांना नैसर्गिक पोषण देता येते. जाणून घ्या हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय.

Mayuri Gawade

घरातील कुंडीतली रोपं हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली दिसावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण महागडी खतं वापरतात. मात्र, रोजच्या स्वयंपाकघरातल्या साध्या गोष्टी वापरूनही रोपांची वाढ अधिक चांगली करता येते. कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने रोपांना पोषण देण्यासाठी हे काही सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात.

१. केळीच्या सालींचा वापर
केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. सालींचे छोटे तुकडे करून २ ते ३ दिवस पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी गाळून त्यात थोडं साधं पाणी मिसळा आणि १० ते १५ दिवसांतून एकदा रोपांना द्या. यामुळे रोपांना भरपूर फुलं येतात.

२. गुळाचं पाणी
माती सुपीक राहण्यासाठी गूळ खूप उपयुक्त ठरतो. ५० ग्रॅम गूळ १ लिटर पाण्यात मिसळून २४ तास ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून समान प्रमाणात साधं पाणी मिसळा. महिन्यातून एकदा हे मिश्रण रोपांना दिल्यास मातीची गुणवत्ता सुधारते.

३. कांदा-बटाट्याच्या साली
कांदा आणि बटाट्याच्या सालींमध्ये रोपांसाठी आवश्यक घटक असतात. या साली पाण्यात २ दिवस भिजत ठेवा. नंतर ते पाणी गाळून त्यात दुप्पट साधं पाणी मिसळा आणि १५ दिवसांतून एकदा रोपांना द्या. यामुळे रोपांची वाढ चांगली होते.

४. एप्सम सॉल्टचा वापर
१ लिटर पाण्यात १ टीस्पून एप्सम सॉल्ट मिसळून महिन्यातून एकदा रोपांवर शिंपडा. यामुळे रोपं हिरवीगार राहतात आणि त्यांची वाढ सुधारते.

५. तांदळाच्या पाण्याचा उपयोग
तांदूळ धुतल्यावर उरलेलं पाणी टाकू नका. हे पाणी रोपांना दिल्यास त्यांना नैसर्गिक पोषण मिळतं आणि वाढ वेगाने होते.

उन्हाळ्यात रोपांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अशा साध्या घरगुती उपायांनी कमी खर्चात रोपं निरोगी, टवटवीत आणि फुलांनी बहरलेली ठेवता येतात.

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता