(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

चामखीळ घालवण्यासाठी महागडे उपचार करताय? त्याआधी करा घरच्या घरी 'हे' ४ उपाय

अनेकजण चामखीळ काढण्यासाठी महागडे उपचार किंवा शस्त्रक्रियेचा मार्ग निवडतात, मात्र काही सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय नियमितपणे केले तर चामखीळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

किशोरी घायवट-उबाळे

चामखीळ ही त्वचेवरील एक सामान्य पण अनेकांना त्रास देणारी समस्या आहे. हात, पाय, मान किंवा चेहऱ्यावर चामखीळ आढळून येते. ही समस्या बहुतेक वेळा HPV (Human Papilloma Virus) मुळे उद्भवते. चामखीळ वेदनादायक नसले तरी ते दिसायला खराब वाटते आणि ते अगदीच चेहऱ्यावर असले तर त्याचा आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. अनेकजण चामखीळ काढण्यासाठी महागडे उपचार किंवा शस्त्रक्रियेचा मार्ग निवडतात, मात्र काही सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय नियमितपणे केले तर चामखीळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यातील चामखीळ घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी नियंत्रणात येऊ शकते. लसूण हा अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त असल्याने चामखीळ काढण्यासाठी प्रभावी मानला जातो.

लसणाची पेस्ट चामखीळावर लावून पट्टी बांधल्यास हळूहळू चामखीळ सुकू लागते. तसेच केळीच्या सालीचा आतील भाग रोज रात्री चामखीळावर चोळल्यास त्वचेतील संसर्ग कमी होतो आणि चामखीळ आपोआप निघून जाण्यास मदत मिळते.

याशिवाय अॅपल सायडर व्हिनेगर हा उपायही मोठ्या प्रमाणात चामखीळसाठी वापरला जातो. कापसाच्या मदतीने व्हिनेगर चामखीळावर लावल्यास त्यातील आम्ल मुळावर परिणाम करून ते नष्ट करण्यास मदत करते. मात्र हा उपाय करताना त्वचेवर जळजळ होत असल्यास तो थांबवणे आवश्यक आहे. आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे हळद आणि मधाचे मिश्रण. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेचा संसर्ग कमी करतात, तर मध त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करतो.

हे घरगुती उपाय करताना सातत्य आणि संयम आवश्यक आहे. काही दिवसांत परिणाम न दिसल्यास घाबरण्याची गरज नाही. मात्र चामखीळ आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा रक्तस्राव होत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य काळजी आणि नैसर्गिक उपायांनी चामखीळपासून मुक्ती मिळू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

सुनेत्रा पवारांचा भाजपला दणका; पालकमंत्री होताच पुण्यातील महत्त्वाचे कार्यालय बारामतीला हलवले

SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल