लाईफस्टाईल

बाजारातील डेझर्ट विसरा! घरच्या घरी बनवा थंडगार फ्रूट क्रीम, मुलं पुन्हा पुन्हा मागतील

उन्हाळ्यात मुलांसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी थंडगार व चविष्ट बनवायचं आहे? मग ताज्या फळांपासून तयार होणारी ही फ्रूट क्रीम रेसिपी नक्की करून पाहा. काही मिनिटांत तयार होणारा हा डेझर्ट चवदार तर आहेच, शिवाय पाहुणचारासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो.

Mayuri Gawade

गरमाच्या दिवसांत काहीतरी थंड, हलकं आणि चविष्ट खावंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. विशेषत: लहान मुलांना रोजच आईस्क्रीम किंवा बाहेरचे गोड पदार्थ खायची इच्छा असते. मात्र सतत बाजारातील डेझर्ट खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेला पौष्टिक पर्याय निवडला, तर चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधता येतो.

अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे फ्रूट क्रीम. ताज्या फळांचा गोडवा, फ्रेश क्रीमची मऊसर चव आणि ड्रायफ्रुट्सचा खमंगपणा यामुळे हा पदार्थ प्रत्येक वयोगटाला आवडतो. विशेष म्हणजे काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी पाहुणचारासाठीही उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य

  • फ्रेश क्रीम

  • आवडीनुसार ताजी फळे

  • पिठीसाखर

  • व्हॅनिला इसेन्स

  • सुका मेवा

कृती

सर्वप्रथम निवडलेली फळे स्वच्छ धुवून काही वेळ पाण्यात ठेवावीत. त्यानंतर त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.

एका मोठ्या भांड्यात फ्रेश क्रीम घ्या. त्यात पिठीसाखर आणि काही थेंब व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण चांगले फेटून घ्या.

तयार क्रीम दोन ते तीन तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. यामुळे क्रीम अधिक घट्ट आणि स्वादिष्ट होते.

फ्रिजमधून काढल्यानंतर क्रीम पुन्हा एकदा हलके फेटा. त्यामध्ये कापलेली फळे आणि सुका मेवा घालून सर्व साहित्य एकजीव करा.

हे मिश्रण पुन्हा काही वेळ थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

सर्व्ह करताना

थंडगार फ्रूट क्रीम सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून वरून ड्रायफ्रुट्स किंवा काही ताज्या फळांचे तुकडे सजावटीसाठी घालू शकता. उन्हाळ्यातील दुपार, संध्याकाळची भूक किंवा खास प्रसंगांसाठी हा एक परफेक्ट डेझर्ट ठरू शकतो.

फ्रूट क्रीम खाण्याचे फायदे

  • ताज्या फळांमुळे शरीराला विविध जीवनसत्त्वे मिळतात.

  • मुलांच्या आहारात फळांचा समावेश करण्याचा हा चविष्ट मार्ग आहे.

  • बाजारातील जास्त साखरयुक्त डेझर्टपेक्षा तुलनेने हलका पर्याय ठरू शकतो.

  • उन्हाळ्यात शरीराला फ्रेश आणि ताजेतवाने वाटण्यास मदत होते.

दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये, पुण्यात भारत मंडपम... मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ मोठे निर्णय

भारत सोडावा लागणार? अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवर आता २ नोव्हेंबरला सुनावणी

सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली अवघी ३३ मतं; निकाल पाहून ज्योतिषाला धक्का

मुंबई महापालिकेच्या निवृत्त अभियंत्यांच्या पेन्शनला कात्री; अनधिकृत बांधकाम प्रकरण भोवले

बदनामी करणाऱ्या शिपायाला दणका; पुनर्नियुक्ती करण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द