How far should mobile kept while sleeping  Canva
लाईफस्टाईल

Mobile : रात्री झोपताना मोबाईल स्वतःपासून किती दूर ठेवावा? ९९ टक्के लोक करतात ही चूक

अनेकजण रात्री झोपताना सुद्धा मोबाईल आपल्या जवळ घेऊन झोपतात. मात्र यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Pooja Pawar

मोबाईल फोन आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलचा वापर करतात. सोशल मीडियामुळे या मोबाईलचा वापर सध्या प्रचंड वाढलेला दिसतो. अनेकजण रात्री झोपताना सुद्धा मोबाईल आपल्या जवळ घेऊन झोपतात. मात्र यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा रात्री झोपताना मोबाईल आपल्या शरीरापासून किती दूर ठेवावा याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

मोबाईल जवळ ठेऊन झोपल्याने काय होतं?

मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन्स हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात असं WHO ने देखील एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे. मोबाईल सतत जवळ ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे डोकेदुखी, प्रजनन क्षमता, स्नायू दुखी इत्यादी त्रास जाणवू शकतात. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्यामुळे झोप न येण्यासंबंधीत समस्या सुद्धा होऊ शकतात. तसेच मोबाईलमधून निघणारी किरणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात.

झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?

अनेकांना मोबाईल उशाशी ठेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रात्री झोपताना मोबाईल तुमच्यापासून जवळपास 3 ते 4 फूट लांब ठेवावा. मोबाईल उशीजवळ किंवा उशीखाली ठेवल्याने तो गरम होऊन उष्णता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे उशीला आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. जर फोन व्हायब्रेशन मोडवर असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई