लाईफस्टाईल

परफेक्ट आयशॅडोची शेड कशी निवडाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

योग्य आयशॅडो निवडला नाही तर संपूर्ण लूक बिघडू शकतो, तर योग्य शेड असलेला आयशॅडो चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतो. त्यामुळे आयशॅडो निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

कोणताही सण, लग्नसमारंभ किंवा पार्टी असो, सुंदर दिसण्यासाठी मेकअप महत्त्वाचा असतो. मेकअपमध्ये डोळे आकर्षक दिसावेत यासाठी आयशॅडो लावणे आवश्यक मानले जाते. मात्र, परफेक्ट लूकसाठी कोणताही आयशॅडो लावून चालत नाही. चुकीच्या रंगाचा आयशॅडो निवडला तर संपूर्ण लूक बिघडू शकतो, आणि योग्य शेड असलेला आयशॅडो निवडला तर चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. त्यामुळे आयशॅडो निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

स्किन टोननुसार आयशॅडो

सर्वात आधी आपल्या त्वचेच्या रंगानुसार आयशॅडो निवडावा. गहूवर्णीय स्किन टोनसाठी ब्राउन, गोल्डन आणि ब्रॉन्झ रंग चांगले दिसतात. तर गोऱ्या त्वचेसाठी पिंक, पीच आणि न्यूड रंग अधिक शोभून दिसतात.

कपड्यांच्या रंगाशी जुळणारा आयशॅडो

आपल्या कपड्यांच्या रंगाशी जुळणारा आयशॅडो निवडल्यास लूक अधिक सुंदर दिसतो. पारंपरिक कपड्यांवर गोल्ड, कॉपर किंवा मॅरून आयशॅडो छान दिसतो, तर वेस्टर्न ड्रेसवर न्यूड किंवा स्मोकी आयशॅडो योग्य ठरतो.

कार्यक्रमाच्या वेळेनुसार आयशॅडो लावा

कार्यक्रमाच्या वेळेनुसार आयशॅडोचा प्रकार निवडावा. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांसाठी मॅट आयशॅडो वापरणे चांगले, तर रात्रीच्या पार्टी किंवा सणासाठी शिमर किंवा ग्लिटर आयशॅडो लूकमध्ये चमक आणतो.

डोळ्यांच्या आकारानुसार आयशॅडोची निवड

डोळ्यांच्या आकारानुसार आयशॅडो लावल्यास डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात. आयशॅडो लावताना नीट ब्लेंडिंग करणे आणि प्रायमर वापरणेही महत्त्वाचे आहे. योग्य आयशॅडो निवडल्यास सण-वाराचा किंवा पार्टीचा लूक अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसतो.

Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

Bhiwandi : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार