Freepik
लाईफस्टाईल

Body detox साठी ताक पंचकर्म कसे करावे? जाणून घ्या योग्य पद्धत

तुम्हाला body detox करण्यासाठी बाहेर मोठा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी 'ताक' पिऊन त्याद्वारेही पंचकर्म करू शकतात. जाणून घ्या body detox म्हणजे काय आणि ताक पंचकर्म कसे करावे?

Kkhushi Niramish

आताच्या काळातील चमचमीत पदार्थ, चटपटीत पदार्थ आणि अन्य चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरात अनेक वेळा विषद्रव्य तयार होतात. आपण जे अन्न खातो त्याचे पाचन होऊन अनावश्यक चोथा मलमूत्रावाटे बाहेर सोडला जातो. मात्र, अनेक वेळा अन्नाचे व्यवस्थित पाचन न झाल्यामुळे शरीरात अनेक वेळा विषारी घटक तयार होतात. परिणामी त्याचे त्वचा आणि शरीराच्या एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी वेळोवेळी बॉडी डिटॉक्स (body detox) करणे महत्त्वाचे असते. तुम्हाला body detox करण्यासाठी बाहेर मोठा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी 'ताक' पिऊन त्याद्वारेही पंचकर्म करू शकतात. जाणून घ्या body detox म्हणजे काय आणि ताक पंचकर्म कसे करावे?

बॉडी डिटॉक्स (body detox) म्हणजे काय?

डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातील विषारी रेणू बदलण्याची आणि काढून टाकण्याची प्रक्रिया. शरीरात असलेले विषारी पदार्थ, म्हणजेच विष किंवा प्रदूषक, हे असे पदार्थ आहेत जे आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. म्हणूनच, शरीर आधीच यकृत, मूत्रपिंड, पचनसंस्था आणि त्वचेद्वारे हे विषारी पदार्थ स्वतःहून काढून टाकते. मात्र, कधी कधी जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. तेव्हा शरीरावर त्याची लक्षणे दिसू लागतात. शरीर त्याद्वारे बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्याची गरज आहे, असे सांगते.

बॉडी डिटॉक्स (body detox) कधी करावे?

शरीर आणि त्वचा तुम्हाला बॉडी डिटॉक्स (body detox) ची योग्य वेळ आली आहे, असे संकेत देत असतात. यामध्ये थकवा येणे, छोट्या-छोट्या कामांमध्ये लगेच थकणे, त्वचा रूक्ष पडणे, त्वचेवर वारंवार पुटकूळ्या येणे, मुरूम येणे, तोंडाची दुर्गंधी, शौचामध्ये अतिशय घाण वास येणे ही सर्व शरीरात विषारी द्रव्य वाढल्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून आल्यास बॉडी डिटॉक्स करायला हवे, असे समजावे.

बॉडी डिटॉक्स (body detox) साठी ताकाचे पंचकर्म फायदेशीर

बॉडी डिटॉक्स (body detox) करण्यासाठी तुम्हाला बाहेर फार जास्त पैसा घालवण्याची गरज नाही. तुम्ही ताकाचे पंचकर्म करूनही बॉडी डिटॉक्स करू शकता. आयुर्वेदात ताकाला अनेक आजारांवर औषध मानले गेले आहे. आहारात नियमित ताकाचा समावेश केल्यास ताक शरीराला आतून स्वच्छ करते. तसेच विषारी घटक द्रव्य शरीराच्या बाहेर फेकण्यास मदत करते.

ताकाचे पंचकर्म कसे करावे?

तुम्ही पहिल्यांदाच ताकाचे पंचकर्म करणार असाल तर आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते करू शकता. ताक पंचकर्म करायचे याचा अर्थ ताकाव्यतिरिक्त काहीही खाऊ नये काहीही पिऊ नये. भूक लागली तरी ताक प्यायचे आणि तहान लागली तरी ताक प्यायचे. अशा प्रकारे किमान दोन ते तीन दिवस केवळ ताक पिणे याला ताक पंचकर्म म्हणतात.

पंचकर्मासाठी ताक कसे असावे?

पंचकर्मासाठी ताक हे ताजे असावे. अर्थात ताज्या दह्यापासून तयार केलेले ताक उत्तम. घरी केलेले ताक सर्वोत्तम असते. ताक फार जुने आंबट झालेले नसावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री