How to Make Aloo Corn Cutlet Freepik
लाईफस्टाईल

Aloo Corn Cutlet Recipe: पावसाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवा बटाटा कॉर्न कटलेट, नोट करा रेसिपी

Tejashree Gaikwad

Monsoon Recipe: आज रविवार आहे. विकेंडला नेहमीच काही तरी टेस्टी खावेसे वाटते. नाष्टसाठी रेगुलर पदार्थ खाऊन आठवड्याभर कंटाळा येतो. मग अशावेळी काही तरी वेगळं हवे असते. बरेच लोक चव आणि आरोग्यास लाभ देणारे स्नॅक्स पसंत करतात. तुम्हालाही असंच काही हवं असेल तर आज आम्ही तुम्हाला बटाटा कॉर्न कटलेट बनवू शकता. याची रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि ही रेसिपी कमी वेळात तयार होते. चला जाणून घेऊयात बटाटा कॉर्न कटलेट कसे बनवायचे ते.

लागणारे साहित्य

उकडलेले स्वीट कॉर्न - २ कप

उकडलेले बटाटे - २

कांदा बारीक चिरलेला – १

बीन्स - १ कप

गाजर चिरून - १

मटार - १/२ कप (पर्यायी)

किसलेली कोबी - १/४ कप

आले किसलेले - १/४ स्पून

हिरवी मिरची चिरलेली – २

हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे

चाट मसाला - १/४ टीस्पून

गरम मसाला - १/२ टीस्पून

हळद - १ चिमूटभर

लाल मिर्च पावडर - १/२टीस्पून

लिंबाचा रस - १ टीस्पून

तेल - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

प्रथम स्वीट कॉर्न आणि बटाटे उकडून घ्या. (त ठेवा की बटाटे जास्त वेळ उकडू नकात. तीन शिट्ट्या झाल्यावर बटाट्याचा कुकर काढा.)

उकडलेले स्वीट कॉर्न एका भांड्यात बाजूला ठेवा आणि उकडलेले बटाटे सोलून मिक्सिंग बाऊलमध्ये मॅश करा.

आता मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये स्वीट कॉर्न, किसलेला कोबी, मटार (ऐच्छिक), गाजर, बीन्स घालून मिक्स करा.

यानंतर त्यात तिखट, चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

कटलेट कुरकुरीत होण्यासाठी थोडे पोहेही घालू शकता.

बटाट्याच्या कॉर्न कटलेटचे मिश्रण तयार झाल्यावर त्याचे गोल गोळे बनवा. यानंतर, गोळे दाबा आणि त्यांना टिक्कीचा आकार द्या.

आता एक नॉनस्टिक तवा घ्या आणि त्यात थोडं तेल टाका, सगळीकडे पसरा आणि मध्यम आचेवर गरम करा.

तवा गरम झाल्यावर कटलेट दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.

सर्व कटलेट त्याच पद्धतीने शिजवा. स्नॅक्ससाठी चवदार बटाटा कॉर्न कटलेट तयार आहेत.

हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन