Freepik
लाईफस्टाईल

Bread Dahi Sandwich: नाश्त्यासाठी बनवा ब्रेड आणि दह्याचे सँडविच, झटपट तयार होईल रेसिपी

Breakfast Recipe: नाश्त्यासाठी ब्रेड आणि दह्यापासून बनवलेले सँडविच ही अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे.

Tejashree Gaikwad

Bread Dahi Sandwich: सकाळचा नाश्ता बनवणे हा मोठा टास्क असतो. सकाळी काय बनवायचे हे समजत नाही. वेळेअभावी प्रत्येकासाठी वेगळा नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत काय करावे हे समजत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला टेस्टी ब्रेड आणि दह्यापासून बनवलेले सँडविच कसे बनवायचे ते सांगत आहोत. हे सँडविच बनवायला खूप सोपे आहे. याची चव एकदम पिझ्झासारखी वाटते. चला ब्रेड दही सँडविच कसा बनवायचा ते जाणून घेऊयात...

लागणारे साहित्य

  • शिमला

  • गाजर

  • टोमॅटो

  • कांदा

  • हिरवी मिरची

  • काळे मीठ

  • मसाला

  • काळी मिरी

  • जिरे पावडर

  • कोथिंबीरीची पाने

  • मीठ

  • बटर ब्रेड

  • दही

जाणून घ्या कृती

  • सिमला मिरची, गाजर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची यांसारख्या भाज्या बारीक चिरून घ्या

  • या भाज्यांच्या मिश्रणात थोडे दही घाला

  • त्यात काळे मीठ, चाट मसाला, काळी मिरी आणि जिरे पावडर मिसळा

  • त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला

  • थोडे मीठ घाला

  • सर्वकाही चांगले तयार करा आणि चांगले मिसळा

  • फेटताना त्यात थोडे बटर घाला

  • आता दोन ब्रेड घ्या. त्यामध्ये बनवलेले हे स्प्रेडर लावा.

  • या ब्रेड स्लाईसवर थोडासा बटर लावा आणि तव्यावर छान भाजून घ्या.

  • अशा प्रकारे तुमचे ब्रेड दही सँडविच तयार होईल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी