manjulaskitchen.com
लाईफस्टाईल

Dahi Bhindi Recipe: नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे? बनाव दही भेंडी, नोट करा रेसिपी

Veg Recipe: तुम्ही घरी दही भेंडीची भाजी बनवू शकता. एकदा दही भेंडी चाखली तर तुम्ही बाकीच्या रेसिपीची चव विसराल.

Tejashree Gaikwad

भेंडीची भाजी अनेकांना आवडते. अगदी लहान ते मोठे सगळेच ही भाजी खातात. भेंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने आरोग्य चांगले राहते. भेंडीची भाजी वेगवगेळ्या पद्धतीने बनवली जाते. कुरकुरीत भेंडी ते सुकी भेंडीची भाजी असे अनेक प्रकार केले जातात. पण हे सगळे प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके भाजी घेऊन आलो आहोत. तुम्ही घरी दही भेंडीची भाजी बनवू शकता. एकदा दही भेंडी चाखली तर तुम्ही बाकीच्या रेसिपीची चव विसराल. दही भेंडीची रेसिपी खूप सोपी आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया दही भेंडीची रेसिपी कशी बनवायची...

लागणारे साहित्य

  • अर्धा किलो भेंडी

  • एक कप दही

  • एक बारीक चिरलेला कांदा

  • अर्धा टीस्पून तिखट

  • अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर

  • मीठ

जाणून घ्या कृती

  • सर्वात आधी अर्धा किलो भेंडी नीट धुवून घ्या. पाणी पुसून खूप बारीक चिरून घ्या.

  • कढईत तेल घालून गरम करा. त्यात भेंडी छान डीप फ्राय करून घ्या. बारीक चिरलेला कांदाही फ्राय करून घ्या.

  • भेंडी- कांदा छान तळून घेतल्यावर गॅस बंद करा.

  • आता एका खोलगट भांड्यात एक वाटी दही काढून चांगले फेटून घ्या. त्यात तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला.

  • त्यानंतर या दह्यामध्ये भेंडी घालून चांगले मिसळा.

  • तुमची मसाला दही भिंडी रेसिपी तयार आहे. तुम्ही चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून