Freepik
लाईफस्टाईल

Hair Care: केसांना रेशमासारखे मऊ आणि घट्ट बनवायचे आहेत? वापरा 'या' फुलाचा मास्क

Hibiscus Hair Mask: केस जाड आणि मुलायम बनवण्यासाठी या फूल खूप फायदेशीर आहे. चला याचा हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

Tejashree Gaikwad

How to make Hibiscus Hair Mask: दाट आणि सिल्की मऊ केस कोणाला नाही आवडतं. सगळ्यांनाच असे वाटते की आपले केस जाड, लांब,मऊ आणि सिल्की असावेत. असे केस आपल्या सौंदर्यात भर घालतात. पण आजकाल अनेकांची अशी तक्रार आहे की त्यांचे केस झपाट्याने कोरडे होत आहेत आणि गळत आहेत. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर तुम्ही केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही घरगुती उपाय ट्राय करून पाहू शकतात. तुम्ही केसांसाठी जास्वंदाचे फूल वापरू शकता. हे फुल केस केवळ मुळांपासूनच मजबूत करत नाहीत तर त्यांचे पोषण देखील करते. जास्वंदाच्या फुलांचा हेअर मास्क बनवून तुम्ही वापरू शकता. चला हा मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

६ ते ७ जास्वंदाची फुले, २० ते २५ कढीपत्ता, ४ ते ५ जास्वंदाची पाने, अर्धा कप कोरफड गर, २ चमचे एरंडेल तेल, ४ ते ५ चमचे पाणी.

कसा बनवायचा मास्क?

हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून अगदी बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात २ चमचे एरंडेल तेल घाला. अशाप्रकारे तुमचा जास्वंदाचा हेअर मास्क तयार आहे.

कसा लावायचा हा हेअर मास्क?

हा मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावू शकता. केस धुण्यापूर्वी हा मास्क तुमच्या केसांवर आणि मुळांवर समप्रमाणात छान लावून घ्या. साधारणपणे २५ मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्यात. आता हळू हळू मसाज करात तुम्ही हा मास्क काढा. मसाज केल्याने जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन सुधारते. पाण्याचा वापर करून तुम्ही नीट हा मास्क काढून घ्या. यानंतर तुमचे केस माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. यामुळे तुमचे केस हळूहळू मुळांपासून मजबूत होतील.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव