Pixabay
लाईफस्टाईल

Paneer Chingari Recipe: पनीरच्या नेहमीच्या डिशेस खाऊन कंटाळा आला आहे? ट्राय करा पनीर चिंगारी

Tejashree Gaikwad

Healthy Veg Recipe: पनीर हे शाकाहारी लोकांसाठी सर्वात उत्तम प्रोटीनच्या स्रोत आहे. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. अगदी स्टार्टर्सपासून भाजी पर्यंत पनीरचा वापर केला जातो. पण एका वेळानंतर नेहमीच्या डिशेस खाऊन कंटाळा येऊ लागतो. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी पनीरच्या भाजीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला पनीर चिंगारी कशी बनवायची ते सांगत आहोत.चला जाणून घ्या पनीर चिंगारी बनवण्यासाठी त्याची रेसिपी.

जाणून घ्या कृती

  • साधारणपणे १०० ग्रॅम पनीर छान बारीक करून घ्या. नंतर या पनीरला मिक्सरच्या भांड्यात ३/४ कप दूध घालून छान फिरवून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा.

  • आता कढई घ्या आणि त्यात २ चमचे तेल घालून गरम होऊ द्या. यानंतर तेलात जिरे, काही कसुरी मेथी आणि मसाले टाकून परतून घ्या. त्याच तेलात १ इंच चिरलेले आले, १ चिरलेली मिरची आणि अर्धा कांदा घालून हलके परतून घ्या. नंतर २ चमचे हिरवा कांदा, २ चमचे हिरवी कोथिंबीर घालून परतून घ्या.

  • गॅसची आच कमी करा आणि मिश्रणात थोडी जिरेपूड, गरम मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. छान सुगंध येईपर्यंत परतून घ्या.

  • या मसाल्यात तयार पनीर आणि दुधाची पेस्ट घालून मिक्स करा. जेव्हा ग्रेव्ही घट्ट होईल आणि हलके तेल सोडू लागेल तेव्हा गॅस बंद करून ग्रेव्ही बाजूला ठेवा.

  • आता मसालेदार पनीर बनवण्यासाठी एक तवा घ्या, त्यात २ चमचे तेल घाला आणि १ चमचा बटर घाला आणि गरम करा. थोडी कसुरी मेथी, १-२ चमचे तीळ घालून हलके तळून घ्या.

  • अर्धा कांदा, १ चिरलेली सिमला मिरची आणि सुमारे १०० ग्रॅम चीज चौकोनी तुकडे करा आणि १ मिनिट तळा. थोडी हळद, १ चमचा तिखट आणि मीठ घालून परतून घ्या.

  • आता पनीरवर २ चमचे कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करा.

  • शेवटी, ग्रेव्हीमध्ये परतलेले मसालेदार पनीर, सिमला मिरची आणि कांदा घाला. अशाप्रकारे स्वादिष्ट पनीर चिंगारी भाजी तयार आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत