Freepik
लाईफस्टाईल

Sugar Free Rabdi Recipe: गणेशोत्सवात बनवा शुगर फ्री रबडी, मधुमेही रुग्णांसाठी आहे बेस्ट; नोट करा रेसिपी

Rabdi Sweet Dish: रबडी ही मिठाई अनेकांना आवडते. मधुमेहाचे रुग्ण पण या टेस्टी पदार्थाची चव घेऊ शकता. यासाठी जाणून घ्या शुगर फ्री रबडीची रेसिपी.

Tejashree Gaikwad

Ganeshotsav 2024: गणपतीचा सण सुरु झाला आहे. या खास दिनी गोढ पदार्थ तर हवेच. सणासुदीत भरपूर गोड पदार्थ आणि मिठाई बनवली जाते. पण या काळात मधुमेहाच्या रुग्णांना खूप इच्छा असूनही मिठाई खाता येत नाही. पण तुम्हाला निराश होण्याची गरज नाही.कारण आम्ही तुमच्यासाठी या काळात खाण्यासाठी बेस्ट शुगर फ्री रबडी घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला रबडीआवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री रबडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शुगर फ्री दूध रबरी कशी बनवायची...

जाणून घ्या रेसिपी

  • २ लिटर फुल फॅट क्रीम दूध एका जाड तळाच्या भांड्यात घ्या. दूध छान उकळवा आणि नंतर आच कमी करा.

  • दूध उकळत असताना काजू, बदाम आणि पिस्ता बारीक चिरून बाजूला घ्या.

  • बारीक केलेले ड्राय फ्रूट्स एक चमचा तुपात भाजून बाजूला ठेवा.

  • रबडी बनवताना ५ तास आधी खजूर आणि अंजीर भिजवा, मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या आणि नॅचरल गोडपणासाठी ही पेस्ट दुधात घाला.

  • गॅसची आच फक्त मध्यमच ठेवा. दूध तव्याच्या तळाशी चिकटू नये, म्हणून ते सतत ढवळत राहा.

  • प्रत्येक वेळी दुधात मलईचा थर तयार झाल्यावर ते चमच्याच्या बाजूने सरकवा. तुम्हाला ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करावी लागेल.

  • दूध निम्मे होईपर्यंत आणि त्याचा पोत क्रीमी होईपर्यंत उकळवावे.

  • दूध अर्ध्यावर आल्यावर भांड्याच्या बाजूने मलईचे थर काढून टाका.

  • दुधाची साय सुकली असेल तर भांड्यातून थोडे गरम दूध बाजूंनी ओतावे. दुधात परत मिसळा.

  • आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स, केशर दूध आणि वेलची पावडर घाला.

  • तुमची टेस्टी रबडी तयार आहे.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत