Yogurt, Chilli and Garlic Curry Recipe in Marathi: आपल्याला रेगुलर भाजी खाऊन कंटाळा येतो. याशिवाय आजकाल बाजारात भाज्याही उपलब्ध नाहीत. अशावेळी तर जेवणात काय बनवायचं हे समजत नाही. अनेकांना भाजीमध्ये काही चटपटीत आणि वेगळ्या रेसिपी ट्राय करायच्या असतात. याचसाठी आम्ही भाजी न वापरता भाजी कशी बनवता येईल ते घेऊन आलो आहे. आम्ही भाजीची एक सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे. या भाजी साठी तुम्हाला दही, मिरची आणि लसूण लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया दह्याची ही स्वादिष्ट भाजी कशी बनवायची...
जाणून घ्या साहित्य
एक वाटी दही, १० ते १२ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून सुकलेली कोथिंबीर, चिमूटभर हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची, चवीनुसार गुलाबी मीठ, २ चमचे तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून बडीशेप
जाणून घ्या कृती
सर्वप्रथम एक कप दही चांगले फेटून घ्या. आता १ टीस्पून सुकलेली कोथिंबीर, चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल मिरची, चवीनुसार गुलाबी मीठ फेटलेल्या दह्यात घाला.
आता हे सर्व साहित्य चांगले मिसळा आणि ठेवून द्या.
आता गॅस चालू करा आणि त्यावर पॅन ठेवा. पॅन छान गरम झाल्यावर त्यात २ चमचे तेल घाला.
तेलात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा बडीशेप आणि कढीपत्ता घाला.
सर्व पदार्थ हलके सोनेरी झाल्यावर त्यात किसलेला लसूण आणि मिरची घाला.
लसूण छान लाल होऊ द्या. लसूण लाल झाल्यावर त्यात दह्याचे मिश्रण घालून चांगले मिक्स करा.
आता त्यात अर्धा कप पाणी घालून भाजी ५ मिनिटे शिजवा.
तुमची भाजी तयार आहे. चपाती किंवा भातासोबत खा.