सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ तुमचे सौंदर्य तर वाढवतातच, शिवाय तुमचे चांगले आरोग्य देखील सूचित करतात. परंतु बदलते हवामान, प्रदूषण, डिहायड्रेशन आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा कमी होऊ लागतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया काळवंडलेल्या, भेगा पडलेल्या ओठांना पुन्हा गुलाबी करण्याचे काही सोपे घरगुती उपाय :
मध आणि लिंबू दोन्ही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहेत, जे ओठांचा काळा रंग कमी करण्यास मदत करतात. मधामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, तर लिंबूमध्ये सिट्रस ऍसिड असते जे ओठांमधील मृत पेशी काढून टाकते आणि त्यांना गुलाबी बनवते. एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब टाका आणि ओठांवर लावा, १०-१५ मिनिटांनी धुवा. तुम्ही लिंबाचा रस, मध आणि साखर यांचं मिश्रण देखील वापरु शकता.साय आणि चणाडाळीचं मिश्रणही ओठांसाठी चांगले स्क्रब म्हणून कार्य करते. या मिश्रणाने मसाज केल्यानंतर ओठ थंड पाण्याने धुवा आणि नंतर साजूक तूप लावून ओठांना मसाज करा.
गुलाबजल फक्त त्वचेसाठीच नाही तर ओठांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे नैसर्गिक ओलावा प्रदान करते आणि ओठांना मऊ आणि गुलाबी बनवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाबजलाचे काही थेंब ओठांवर लावा. यामुळे ओठांचा रंग सुधारतो.
बीटरूटमध्ये नैसर्गिक रंग असतो, ज्यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत होते. बीटरूटचा रस नियमितपणे ओठांवर लावल्याने ओठांचा रंग हलका आणि गुलाबी होऊ शकतो. तुम्ही बीटरूटचा ताजा रस काढून ओठांवर हलका मसाज करू शकता.
एलोवेरा जेलने देखील ओठांचा काळेपणा दूर होतो. एका वाटीत कोरफडीचा गर घ्या. तो ओठांवर लावून चांगला मसाज करा. सुमारे १० ते १५ मिनिटांनंतर कापसाच्या मदतीने स्वच्छ करा.
दोन चमचे बेसन, चिमुटभर हळद आणि गरजेनुसार दूध यांचं मिश्रण करुन तुम्ही बेसन लिप लाइटनिंग मास्क देखील बनवू शकता.