तेलकट, चिवट डागांनी कपडे खराब झालेत? ड्राय क्लिनिंगला पैसे न घालवता वापरा 'हा' घरगुती उपाय 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

तेलकट, चिवट डागांनी कपडे खराब झालेत? ड्राय क्लिनिंगला पैसे न घालवता वापरा 'हा' घरगुती उपाय

तेल, तूप किंवा ग्रेव्हीचे डाग कपड्यांच्या तंतूंमध्ये खोलवर बसतात. अशा वेळी योग्य उपाय केले तर हे डाग कायमचे बसण्याआधीच निघू शकतात. विशेष म्हणजे हा उपाय साडी, सूट, ड्रेस अशा महागड्या कपड्यांसाठीही सुरक्षित मानला जातो.

Mayuri Gawade

लग्नसमारंभ, पार्टी किंवा खास कार्यक्रमासाठी घेतलेल्या कपड्यांची आपण खूप काळजी घेतो. पण एक छोटासा तेलाचा किंवा चिवट पदार्थाचा डाग संपूर्ण ड्रेसची शोभा घालवतो. अशावेळी अनेक जण सरळ ड्राय क्लिनिंगचा पर्याय निवडतात. मात्र, घरातच उपलब्ध असलेल्या दोन साध्या वस्तू वापरून हे हट्टी डाग सहज काढता येतात, तेही कमी खर्चात.

ड्राय क्लिनिंगऐवजी घरगुती उपाय का उपयोगी?

तेल, तूप किंवा ग्रेव्हीचे डाग कपड्यांच्या तंतूंमध्ये खोलवर बसतात. अशा वेळी योग्य उपाय केले तर हे डाग कायमचे बसण्याआधीच निघू शकतात. विशेष म्हणजे हा उपाय साडी, सूट, ड्रेस अशा महागड्या कपड्यांसाठीही सुरक्षित मानला जातो.

आवश्यक साहित्य

  • टॅल्कम पावडर (साधी कोणतीही)

  • चूना (पानात वापरला जाणारा)

  • गरम पाणी

  • हलका डिटर्जंट पावडर

डाग काढण्याची सोपी पद्धत (Step-by-Step DIY Tips)

कपडा नीट पसरवा-
ज्या ठिकाणी डाग लागला आहे, तो भाग सपाट पसरवून घ्या. डाग स्पष्ट दिसेल याची खात्री करा.

टॅल्कम पावडर वापरा-
डागाच्या जागेवर भरपूर प्रमाणात टॅल्कम पावडर टाका. ही पावडर तेल शोषून घेण्यास मदत करते.

चूना लावा आणि थांबा-
आता टॅल्कम पावडरवर हलक्या हाताने चूना पसरवा. हे मिश्रण साधारण १५ मिनिटे तसेच ठेवा. या वेळेत ते तेलाचे कण शोषून घेतं.

हलकं घासून धुवा-
१५ मिनिटांनंतर मऊ ब्रशने किंवा हाताने हलक्या हाताने डागाची जागा घासा. नंतर गरम पाण्यात थोडं डिटर्जंट मिसळून कपडा चोळा.

स्वच्छ पाण्याने धुवा-
शेवटी साध्या पाण्याने कपडा धुवा. डाग हलका झालेला किंवा पूर्णपणे निघालेला दिसेल.

लक्षात ठेवा !

तेलाचा किंवा चिवट डाग लागल्यानंतर थेट पाणी अजिबात टाकू नका. पाणी टाकल्यास डाग कपड्याच्या फायबरमध्ये अधिक घट्ट बसतो आणि नंतर तो काढणं कठीण होतं.

खाद्यतेलाच्या पॅकिंग आकाराचे मानांकन होणार; पारदर्शकता वाढण्याचा उद्योग क्षेत्राचा अंदाज

FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

कोकण रेल्वेची जुलैपासून रत्नागिरी ते जेएनपीटी थेट कंटेनर रेल्वे सेवा

ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

Nashik : बड्या विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल; एनए प्लॉटच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक