दरवेळी ब्लाऊज शिवणं नको! बघा सर्व साड्यांवर शोभतील ट्रेंडी ब्लाऊज

महागडी साडी असली तरी ब्लाऊज मॅच नसेल, तर सगळा स्टाईल पॉइंट जातो. कॉन्ट्रास्ट रंग आणि योग्य पॅटर्न निवडला, तर एकाच ब्लाऊजचा वापर अनेक साड्यांसोबत करता येतो. म्हणूनच सध्या महिलांचा फोकस ‘स्मार्ट ब्लाऊज कलेक्शन’कडे आहे.
दरवेळी ब्लाऊज शिवणं नको! बघा सर्व साड्यांवर शोभतील ट्रेंडी ब्लाऊज
Published on
सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट

दरवेळी साडी घेताना मॅचिंग ब्लाऊज शिवणं आता गरजेचं राहिलेलं नाही. योग्य ब्लाऊज असेल, तर साधी साडीही ट्रेंडी आणि महागडी दिसू शकते. मिक्स अँड मॅच ब्लाऊजमुळे वेळही वाचतो आणि पैसेही.

महागडी साडी असली तरी ब्लाऊज मॅच नसेल, तर सगळा स्टाईल पॉइंट जातो. कॉन्ट्रास्ट रंग आणि योग्य पॅटर्न निवडला, तर एकाच ब्लाऊजचा वापर अनेक साड्यांसोबत करता येतो. म्हणूनच सध्या महिलांचा फोकस ‘स्मार्ट ब्लाऊज कलेक्शन’कडे आहे.

दरवेळी ब्लाऊज शिवणं नको! बघा सर्व साड्यांवर शोभतील ट्रेंडी ब्लाऊज
ऑफिस लूकमध्ये ग्रेस आणि एलिगन्स हवा? वर्किंग वुमनसाठी हटके स्टाइल आयडिया

दरवेळी नवं ब्लाऊज शिवण्यापेक्षा, हे मल्टियूज ब्लाऊज जास्त उपयोगी ठरतात.

मरून रंगाचा प्लेन बॉडी आणि प्रिंटेड स्लीव्ह असलेला हा ब्लाऊज साध्या साड्यांवर खूप उठून दिसतो. हिरवा, टील, क्रीम किंवा मस्टर्ड साडीसोबत परफेक्ट कॉन्ट्रास्ट तयार होतो. ऑफिसपासून कॅज्युअल फंक्शनपर्यंत सहज वापरता येणारा स्मार्ट ब्लाऊज.

अजरख प्रिंटमुळे हा ब्लाऊज पारंपरिक आणि ट्रेंडी असा दोन्ही लूक देतो. काळी, मरून, रस्ट किंवा इंडिगो साडीसोबत अप्रतिम दिसतो. प्लेन कॉटन किंवा लिनन साड्यांसोबत रोजच्या वापरासाठी योग्य.

काळ्या रंगाचा हा सॉलिड ब्लाऊज कोणत्याही साडीवर एलिगंट लूक देतो. बेज, ग्रे, पेस्टल किंवा ब्राइट रंगांच्या साड्यांवर हा ब्लाऊज छान बॅलेन्स करतो. एकाच ब्लाऊजचा मल्टिपल साड्यांसोबत वापर करता येतो.

दरवेळी ब्लाऊज शिवणं नको! बघा सर्व साड्यांवर शोभतील ट्रेंडी ब्लाऊज
Wardrobe Goals : ऑफिसपासून कॅज्युअल कार्यक्रमांपर्यंत… गिरिजा ओकच्या कॉटन साड्यांत दिसतो प्रेझेंटेबल आणि कम्फर्टेबल लूक

हाय नेक आणि ब्रॉकेड फॅब्रिक तसेच डिप नेक ब्लाऊज रॉयल आणि क्लासी वाटतो. रेड, मरून, एमराल्ड ग्रीन किंवा नेव्ही ब्लू साड्यांवर सुंदर कॉन्ट्रास्ट दिसतो. लग्न, रिसेप्शन किंवा सण-समारंभांसाठी परफेक्ट चॉईस.

हलका फ्लोरल प्रिंट असलेला हा ब्लाऊज साडीला फ्रेश आणि सॉफ्ट लूक देतो. ग्रीन, पिंक, ऑफ-व्हाईट किंवा यलो साडीसोबत सहज मॅच होतो. डे फंक्शन, ऑफिस किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी योग्य.

कलरफुल प्रिंटमुळे हा ब्लाऊज अगदी साध्या साडीला देखील स्टायलिश बनवतो. क्रीम, ग्रे, बेज किंवा सिंगल टोन साड्यांसोबत उत्तम कॉन्ट्रास्ट मिळतो. एकाच ब्लाऊजचा वापर वेगवेगळ्या साड्यांसाठी करता येतो.

logo
marathi.freepressjournal.in