Pratipandharpur Wadala प्रतिपंढरपुर वडाळा/ Facebook
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूरला जाता येत नाहीये? मुंबईच्या 'या' प्रतिपंढरपूर मंदिरात घ्या दर्शन

Prati Pandharpur Wadala: १७ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील ४०० वर्ष जुन्या प्रति पंढरपूर मंदिराला भेट द्या.

Tejashree Gaikwad

Pandharpur: हिंदू धर्मात आषाढी एकादशी फार महत्त्वाचे आहे. उत्सवाच्या एक आठवडा आधी, महाराष्ट्राच्या विविध भागातील भक्त, वारकरी चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील पंढरपूर या शहराकडे पायी प्रवास करतात. परंतु प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नसते. पण विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालच असते. तुमचेही असेच असेल तर तुम्ही मुंबईतील प्रतिपंढरपूर मंदिराला भेट देऊ शकता. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक मुंबईतील वडाळा येतील ४०० वर्ष जुन्या प्रति पंढरपूर मंदिराला भेट देऊ शकता.

मंदिराची खासियत

पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठोबा आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगळ्या ठेवलेल्या आहेत. परतून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. ४,००० चौरस मीटर मंदिर परिसरात गणपती आणि शिवाची मंदिरे देखील आहेत.

माहितीनुसार, हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण भक्ती चळवळीचे कवी-संत संत तुकाराम यांनी १७ व्या शतकात येथे प्रथम मंदिराची पायाभरणी केली. त्यावेळी तिथे वडाच्या झाडांशिवाय काहीही नव्हते. आपल्या मिठाच्या व्यवसायासाठी शहरात फिरणारे संत तुकाराम एका वटवृक्षाखाली बसून उपदेश करीत असत. तिथेच आता मंदिर झाले आहे. मंदिराच्या इथे असलेला वटवृक्ष मंदिरापेक्षा जुना असल्याचे मानले जाते.

कसे पोहचायचे मंदिरापर्यंत?

या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही वडाळा रेल्वे स्थानकात उतरून पायी चालत जाऊ शकता. याशिवाय तुम्ही दादर स्थानकात उतरूनही टॅक्सीने मंदारीपर्यंत येऊ शकता. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल जाणून घ्या.

आषाढी एकादशी यात्रेच्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर (प्रति पंढरपुर), वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावीक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे सदर परिसरातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी