Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मजेदार विनोद.

> नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…

ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…

बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा

पासवर्ड सांगा बर…!

नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!

> डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात

आणि

सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…

काही कळतच नाहीये,

यांना नेमकं काय झालंय ते…?

बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते

पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!

(पेशंट फरार आहे…)

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

छठ पूजेमुळे 3 हजार कोटींची उलाढाल; BMC सज्ज

लग्नाळूसाठी यंदा 'गुड न्यूज'! नोव्हेंबरपासून जून अखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त; लग्नसराईशी संबंधित व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस

Mumbai : दंड रद्द करा, अन्यथा झाडावरून उडी मारतो; टॅक्सीचालकाच्या धमकीमुळे पोलिसांची पळापळ

IND vs AUS : रोहित-विराटकडून चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट! भारताचे ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून वर्चस्व; शतकवीर रोहित मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू