Freepik
लाईफस्टाईल

चमकदार त्वचा आणि दाट केस मिळवण्यासाठी 'या' पदार्थाचा करा आहारात समावेश आणि पाहा फरक

प्रत्येकालाच वाटते आपली त्वचा सुंदर, पिंपल नसलेली, डाग विरहित असावी. तसेच केस दाट, मऊ आणि सुंदर असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेणे, बाजारातील महागडे प्रोडक्टस वापरणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. तर काही जण घरगुती उपाय देखील करतात.

Kkhushi Niramish

प्रत्येकालाच वाटते आपली त्वचा सुंदर, पिंपल नसलेली, डाग विरहित असावी. तसेच केस दाट, मऊ आणि सुंदर असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेणे, बाजारातील महागडे प्रोडक्टस वापरणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. तर काही जण घरगुती उपाय देखील करतात. चमकदार त्वचा आणि दाट केस मिळवण्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. दररोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास त्वचा चमकदार आणि केस मऊ होतात.

गुळातील पौष्टिक तत्वे

गूळ हे शरिरासाठी खूप फायदेशीर आहे. पूर्वी गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा उपयोग केला जायचा. गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

गुळाचे त्वचेसाठीचे फायदे

अँटी एजिंग

गूळ हे अँटी एजिंग आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या गुळाच्या सेवनाने कमी होतात. याशिवाय वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या खुणाही गुळामुळे जातात.

मुरूम आणि पुटकुळ्यांना आळा

चेहऱ्यावर मुरूम येणे हे सौंदर्याला खूपच मारक ठरते. मुरुम ही एक गंभीर सौंदर्य समस्या आहे. गूळ खाल्ल्याने मुरुम कमी होण्यास मदत मिळते. तसेच सेंद्रीय काळा गूळ खाल्ल्याने रक्तशूद्ध होते. सौंदर्य समस्यांचा थेट संबंध रक्ताच्या शुद्धीसोबत असतो. त्यामुळे गुळाचा आहारात समावेश केल्याने रक्तशूद्ध होते. ज्यामुळे त्वचेवर पुटकुळ्या येण्यास आळा बसतो.

या व्यतिरिक्त त्वचेवरील डाग कमी करण्यासही गूळ महत्त्वाची भूमिका बजावतो व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

केसांसाठी होणारे फायदे

तुमचे केस नेहमीच गळत असतील तर गुळाचे सेवन करायला हवे. गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गूळ खाल्ल्याने केस केस मजबूत व दाट बनतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत