थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणं आणि पायांच्या टाचांना भेगा पडणं ही अत्यंत सामान्य समस्या आहे. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरूनही या भेगा पुन्हा पुन्हा दिसू लागतात. पण घरात सहज मिळणारी तुरटी हीच तुमच्या या समस्येवरचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकते. फक्त १० रुपयांत मिळणारी ही साधीशी वस्तू पायांच्या टाचांना मऊ, गुळगुळीत आणि निरोगी बनवू शकते.
थंडीच्या दिवसांत टाचांना भेगा का पडतात?
थंडीमध्ये हवेतला ओलावा कमी होतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. सतत उभं राहणं, चप्पलमध्ये धूळ आणि घाम साचणं, तसेच पुरेशी आर्द्रता न राखल्यामुळे टाचांना भेगा पडतात. काही वेळा या भेगांमधून रक्त येतं, वेदना वाढतात आणि चालताना त्रास होतो.
यावर तुरटी उपयोगी कशी?
तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात, इन्फेक्शन कमी होतं आणि जखमा लवकर भरतात. प्राचीन काळापासून तुरटीचा वापर शरीर शुद्धीकरणासाठी, जखम स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी केला जातो.
पायांवरील भेगा दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा?
१. एका टबमध्ये कोमट पाणी घ्या.
२. त्यात थोडी तुरटी (सुमारे एक चमचा) टाका आणि नीट विरघळवा.
३. पाय त्या पाण्यात १० ते १५ मिनिटं बुडवून ठेवा.
४. त्यानंतर हलक्या हाताने पाय साफ करा आणि कोरडे पुसून मॉइश्चरायझर किंवा नारळाचं तेल लावा.
हा उपाय आठवड्यातून ३ वेळा केल्यास टाचांवरील भेगा हळूहळू कमी होतात आणि त्वचा मऊ व गुळगुळीत दिसते.
तुरटीचे इतर फायदे
दुर्गंधीवर नियंत्रण: बूट किंवा मोजे घालून दिवसभर फिरल्यानंतर येणारी पायांची दुर्गंधी तुरटीच्या पाण्याने कमी होते.
फंगल इन्फेक्शनवर उपाय: पायांवरील फंगल इन्फेक्शन, जळजळ किंवा ‘ॲथलीट फूट’सारख्या समस्यांवर तुरटी अत्यंत प्रभावी आहे.
थकलेल्या पायांना आराम: दिवसभर चालल्यानंतर किंवा प्रवासानंतर पाय दुखत असतील, तर तुरटीच्या गरम पाण्याने शेक दिल्यास आराम मिळतो.
घरगुती आणि नैसर्गिक उपाय
तुरटी हा स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. कोणत्याही केमिकलयुक्त क्रीमपेक्षा हा उपाय अधिक सुरक्षित आहे. सातत्याने वापर केल्यास पायांच्या टाचांना पडणाऱ्या भेगा कमी होऊन पायांना नैसर्गिक मऊपणा आणि चमक परत येते.