Masala Grapes Recipe : आंबट-चटपटीत मसाला द्राक्षांची टेस्टी रेसिपी; ५ मिनिटांत होईल तयार  
लाईफस्टाईल

Masala Grapes Recipe : आंबट-चटपटीत मसाला द्राक्षांची टेस्टी रेसिपी; ५ मिनिटांत होईल तयार

नेहमीप्रमाणे फक्त साधी द्राक्षे खाण्याऐवजी त्यांना मसालेदार ट्विस्ट दिला, तर त्याची चव आणखी वाढू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात थंडगार आणि रसाळ द्राक्षे खायला अनेकांना आवडतात. पण नेहमीप्रमाणे फक्त साधी द्राक्षे खाण्याऐवजी त्यांना मसालेदार ट्विस्ट दिला, तर त्याची चव आणखी वाढू शकते. आंबट, गोड आणि चटपटीत फ्लेवर आवडणाऱ्यांसाठी मसाला ग्रेप्स ही परफेक्ट रेसिपी आहे. खास म्हणजे ही रेसिपी अवघ्या ५ मिनिटांत तयार होते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

मसाला ग्रेप्ससाठी लागणारे साहित्य :

  • काळी किंवा हिरवी द्राक्षे

  • १ लिंबाचा रस

  • १/२ टीस्पून चाट मसाला

  • १/४ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

  • १/४ टीस्पून काळं मीठ

  • १/४ टीस्पून मीठ

  • १/२ टीस्पून गुळाची पावडर

  • १/४ टीस्पून जिरे पावडर

  • १/४ टीस्पून आमचूर पावडर

मसाला ग्रेप्स बनवण्याची कृती :

सर्वप्रथम द्राक्षे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि देठ वेगळे करा. एका मोठ्या बरणीत किंवा डब्यात द्राक्षे घाला. त्यामध्ये लिंबाचा रस, चाट मसाला, लाल तिखट, काळं मीठ, मीठ, गुळाची पावडर, जिरे पावडर आणि आमचूर पावडर घाला.

आता बरणीचं झाकण बंद करून सर्व साहित्य चांगलं हलवून मिक्स करा. मसाले द्राक्षांना व्यवस्थित लागल्यानंतर चटपटीत मसाला ग्रेप्स सर्व्ह करा.

टिप्स :

  • द्राक्षे फ्रिजमध्ये थंड करून वापरल्यास चव अधिक छान लागते.

  • गोड आणि आंबट चवीचा बॅलन्स ठेवण्यासाठी गुळाचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • अधिक तिखट चव हवी असल्यास थोडंसं जास्त लाल तिखट घालू शकता.

  • पार्टी स्नॅक म्हणून सर्व्ह करताना वरून थोडा चाट मसाला आणि पुदिन्याची पाने घातल्यास चव वाढते.

चटकदार आणि हेल्दी स्नॅक हवा असेल, तर मसाला ग्रेप्सची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा