Pinterest
लाईफस्टाईल

Lion's Gate Portal 2024: मनातली इच्छा पूर्ण करायची आहे? आज 'या' वेळेला करा मॅनिफेस्ट

Lions Gate Portal August 8: ८ ऑगस्ट २०२४ हा दिवस खूप खास आहे, कशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता हे ज्योतिष आणि अंक विशारद यांच्याकडून जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

Infinite Abundance: ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. आज म्हणजेच ८ ऑगस्ट २०२४ रोजी ८-८-८ चा योगायोग असणार आहे. या कारणामुळे हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास मानला जातो. ज्योतिषशास्त्रीय विश्वासांनुसार, ही वेळ अशी आहे जेव्हा सिंहाचे गेट पोर्टल (Lion's Gate Portal 2024) उघडते. हा काळ वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणून पाहिला जातो.

या संख्येचे महत्त्व काय आहे?

आज आठव्या महिन्यातली ८, आठ तारीख आहे आणि जर २०२४ चे अंक एकत्र जोडले (२+०+२+४) तर ८ हा अंक देखील प्राप्त होतो. अशा स्थितीत आज ८८८ चा विशेष योगायोग घडत आहे. ज्योतिषशास्त्रात या संख्येला खूप मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, सिंह गेट पोर्टल या दिवशी उघडते आणि आध्यात्मिक ऊर्जा शिखरावर असते. अशा परिस्थितीत या दिवशी व्यक्तीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता खूप वाढते.

ज्योतिष आणि अंक विशारद मितेश रतिश जोशी सांगता की, "अंकशास्त्रानुसार ८ ऑगस्ट हा दिवस इच्छापूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे.ऑगस्ट या महिन्याचा अंक सुद्धा आठ येतो.आठ या अंकावर शनीचा या ग्रहाच स्वामीत्व आहे.आठ या अंकावरूनच कालचक्राचा बोध होतो.सत्व,रज व तम् यांचे संतुलन करण्याचे सामर्थ्य आठ या अंकात आहे.आठ हा अत्यंत शक्तिमान अंक समजला जातो.या अंकाकडे संपत्तीयोग आहे.या अंकाची जी शक्ती आहे तिचा उपयोग मानवी कल्याणासाठी केला जातो.त्यामुळे आज आठ ऑगस्टला रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी असा एक उपाय करा ज्याने तुमचं भाग्य चमकेलं."

उपाय काय करावा ?

ज्योतिष आणि अंक विशारद मितेश रतिश जोशीनुसार पिवळा,हिरवा किंवा पांढऱ्या रंगाचा कागद घ्या.पिवळ्या रंगामध्ये इच्छापूर्ण करण्याची ताकद मोठ्या प्रमाणात असते.हिरवा रंग हा ग्रोथसाठी काम करतो तर पांढरा हा रंग जीवनामध्ये सत्य,शुद्धता व शांतता प्रदान करतो. तुमच्या इच्छेच्या गरजेप्रमाणे कोणत्याही रंगाचा एक कागद घ्या. निवडलेल्या रंगीत कागदावर जी इच्छा लिहिणार आहात त्या इच्छेसाठी योग्य रंगाच्या पेनचा वापर करा.

  • रिलेशनशिप,प्रेम,लग्न यासाठी लाल रंगाचा पेन वापरा.

  • धनलाभ आणि ऐश्वर्य वृद्धीसाठी हिरव्या रंगाचा पेन वापरा.

  • आजारपण,नकारात्मकता,सुरक्षा,कोर्टकचेरीत यश यासाठी काळ्या रंगाचा पेन वापरा.

  • शिक्षण आणि नोकरीतील करियर ग्रोथसाठी केशरी रंगाच्या पेनचा वापर करा.

  • अध्यात्मिक प्रगतीसाठी जांभळ्या रंगाच्या पेनचा वापर करा.

  • संतानप्राप्तीसाठी किंवा मुलांसाठीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गुलाबी रंगाच्या पेनचा वापर करा.

  • निळा हा युनिव्हर्सल रंग असल्याने तो सर्वप्रकारची मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे.त्यामुळे निळ्या रंगाचा पेन कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करेल.

उपाय कसा करावा ?

८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी निवडलेल्या पेपरवर योग्य पेनाने एक इच्छा आठ वेळा लिहा.इच्छा लिहीत असताना ती मोठ्याने म्हणा.तुमच्या दोन-तीन इच्छा असतील तर प्रत्येक इच्छेसाठी वेगळा पेपर आणि पेन तयार ठेवा.

थोड्या वेळाने तो पेपर जाळून टाका व त्याची राख अंगणात किंवा टेरेसवर उभे राहून फुंकर मारून हवेमध्ये उडवा. आठ महिन्याच्या आत इच्छापूर्ण होईल.

पावसाचे थैमान सुरूच; मुंबई, ठाणे, पालघरमध्ये कहर, जनजीवन विस्कळीत; नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर

पावसाला सुट्टी नाहीच! रविवारचा दिवस पावसाने गाजवला; मुंबई शहर, उपनगरात धुवांधार कायम

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती