लाईफस्टाईल

माघी गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास उकडीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

नारळ-गूळ यांचे गोड सारण आणि तांदळाच्या पिठाची उकड असलेले मोदक हे बाप्पाचे आवडते नैवेद्य मानले जाते. यंदा माघी गणपतीनिमित्त घरीच सोप्या पद्धतीने पारंपरिक उकडीचे मोदक बनवण्यासाठी वाचा रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

माघी गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन होताच उकडीचे मोदक अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. नारळ-गूळ यांचे गोड सारण आणि तांदळाच्या पिठाची उकड असलेले मोदक हे बाप्पाचे आवडते नैवेद्य मानले जाते. यंदा माघी गणपतीनिमित्त घरीच सोप्या पद्धतीने पारंपरिक उकडीचे मोदक बनवण्यासाठी वाचा सोपी रेसिपी.

साहित्य -

सारणासाठी :

  • किसलेला ओला नारळ - १ वाटी

  • गूळ - पाऊण वाटी

  • वेलदोडा पूड - अर्धा टीस्पून

  • जायफळ पूड - चिमूटभर

उकडीसाठी :

  • तांदळाचे पीठ - १ वाटी

  • पाणी - दीड वाटी

  • मीठ - चिमूटभर

  • तूप किंवा तेल - १ टीस्पून

कृती :

  • सर्वप्रथम कढईत किसलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाले की वेलदोडा व जायफळ पूड घालून गॅस बंद करा. सारण थंड होऊ द्या.

  • आता उकडीसाठी भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि तूप घाला. पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर वाफ येऊ द्या. नंतर पीठ चांगले मळून घ्या.

  • पीठाचा गोळा घेऊन छोटी पातळ पारी करा, त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. तयार मोदक वाफवण्याच्या भांड्यात १० ते १२ मिनिटे वाफवा.

  • गरमागरम उकडीचे मोदक तयार झाले की ते गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.

मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या १० फेऱ्या होणार सुरू; सोमवारपासून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना दिलासा

'माथेरानची राणी' हायडोजन इंजिनवर धावणार; मिनी ट्रेनच्या नव्या प्रवासाची तयारी

BBA, BMS, BBM व BCA प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २० जुलै

Mumbai : समुद्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारणार; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मनोरी प्रकल्पात भूमिगत जलवाहिनीचे जाळे विस्तारणार; जमिनीखाली १२८ मीटर खोल बोगदा खोदणार