लाईफस्टाईल

कारल्याच्या बियांपासून बनवा फेसपॅक, त्वचेसाठी ठरते फायदेशीर

कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. हे सर्व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

Rutuja Karpe

कारलं 'खाणं' हे शरीरासाठी फायद्याच मानलं जातं. कारल्यामध्ये आरोग्यासाठी गरजेचे असणारे घटक तर असतातंच पण कारल्याच्या बियांमध्येही अनेक फायदे दडलेले आहेत. कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. हे सर्व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक आणि तजेदारपणा येते. याशिवाय चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. जाणुन घ्या कारल्याच्या बियांपासून फेसपॅक कसं तयार करायचं

असा बनवा फेस पॅक

  • कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कारल्याच्या बिया, 1 चमचा मध आणि 1 चमचा दही लागेल. कारल्याच्या बियापासून फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम हे बिया चांगले धुवा. त्यानंतर ते बारीक करून घ्या.

  •  यानंतर त्यात मध आणि थोडं दही घालून मिक्स करा.

  •  आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे राहू द्या.

  •  काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

  •  हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. अशा प्रकारे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.

  •  तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हा पॅक स्टोअर करू शकता.

  •  कारल्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमची त्वचा हायड्रेट ठेवते.

  •  बियांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात. हे वृद्धत्व देखील प्रतिबंधित करते.

  •  कारल्याच्या बियापासून बनवलेला फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करेल.

  •  हा फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा सुंदर होईल.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल