Summer Special : कॅफे स्टाईल चॉकलेट मिल्कशेक; मुलांसाठी ५ मिनिटांत तयार करा स्पेशल ड्रिंक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : कॅफे स्टाईल चॉकलेट मिल्कशेक; मुलांसाठी ५ मिनिटांत तयार करा स्पेशल ड्रिंक

उन्हाळ्यात थंडगार आणि क्रीमी ड्रिंक हवे? घरच्या घरी अगदी ५ मिनिटांत बनवा कॅफे स्टाईल चॉकलेट मिल्कशेक. जाणून घ्या साहित्य, कृती आणि खास टिप्स.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात काहीतरी थंड, गोड आणि झटपट बनणारे प्यावेसे वाटत असेल, तर मिल्कशेक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरच्या घरी अगदी कमी साहित्यांत तयार होणारा हा चॉकलेटी मिल्कशेक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. क्रीमी टेक्स्चर, चॉकलेटचा रिच स्वाद आणि वरून आईस्क्रीमची टॉपिंग यामुळे हा मिल्कशेक कॅफे स्टाईल ड्रिंकसारखा वाटतो. उन्हाळ्यात पाहुण्यांसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससोबत हा खास ड्रिंक नक्की ट्राय करून पाहा.

साहित्य (२ ग्लासांसाठी) :

  • थंड दूध - २ कप

  • चॉकलेट / व्हॅनिला आईस्क्रीम - २ चमचे

  • साखर (ऐच्छिक) - २ टेबलस्पून

  • बर्फाचे तुकडे - ४ ते ५

  • चॉकलेट सिरप (ऐच्छिक)

  • व्हिप्ड क्रीम (सजावटीसाठी)

  • कोको पावडर किंवा चॉकलेट शेविंग्स (सजावटीसाठी)

कृती :

१. दूध थंड करून घ्या

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात थंड दूध घाला. मिल्कशेक अधिक क्रीमी हवा असल्यास दूध आधीच फ्रीजमध्ये थंड करून ठेवा.

२. आईस्क्रीम आणि साखर घाला

यानंतर त्यात चॉकलेट किंवा व्हॅनिला आईस्क्रीम घाला. गोडी आवडीनुसार साखर घालू शकता.

३. बर्फ टाकून ब्लेंड करा

आता त्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घालून मिश्रण मिक्सरमध्ये ३० ते ४० सेकंद ब्लेंड करा. यामुळे मिल्कशेक स्मूद आणि फेसाळ होईल.

४. ग्लास सजवा

सर्व्हिंग ग्लासच्या आतील बाजूला चॉकलेट सिरप फिरवून ग्लास सजवा. यामुळे मिल्कशेकला आकर्षक कॅफे स्टाईल लूक येतो.

५. मिल्कशेक सर्व्ह करा

तयार मिल्कशेक ग्लासमध्ये ओता. वरून व्हिप्ड क्रीम घाला.

६. सजावट करून सर्व्ह करा

शेवटी वर कोको पावडर, चॉकलेट शेविंग्स किंवा चॉकलेट सिरप घालून सजवा आणि लगेच थंडगार सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक रिच चव हवी असल्यास चॉकलेट आईस्क्रीम वापरा.

  • साखर टाळायची असल्यास फक्त आईस्क्रीमच्या गोड चवीनुसार मिल्कशेक बनवू शकता.

  • वरून ड्रायफ्रूट्स घातल्यास चव आणखी छान लागते.

  • मुलांसाठी बनवताना चॉकलेट सिरप जास्त घातल्यास स्वाद अधिक चांगला लागतो.

  • अधिक घट्ट टेक्स्चरसाठी १ केळे घालूनही हा मिल्कशेक बनवू शकता.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल