Mother's Day 2026 : "सुखाची गं तू साऊली..."; मातृदिनानिमित्त आईला द्या खास शुभेच्छा  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Mother's Day 2026 : "सुखाची गं तू साऊली..."; मातृदिनानिमित्त आईला द्या खास शुभेच्छा

वर्षभर आईचं प्रेम आणि त्याग आपण अनुभवत असतो, पण 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिन हा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस मानला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

आई… प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं. आपल्या आनंदात आनंद मानणारी, संकटात खंबीरपणे साथ देणारी आणि न बोलताही मनातील भावना ओळखणारी व्यक्ती म्हणजे आई. वर्षभर आईचं प्रेम आणि त्याग आपण अनुभवत असतो, पण 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिन हा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस मानला जातो.

यंदा १० मे रोजी जगभरात मातृदिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने अनेक जण आपल्या आईला खास शुभेच्छा, संदेश आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रेम व्यक्त करतात. तुम्हीही या खास दिवशी तुमच्या आईला मनापासून शुभेच्छा पाठवून तिचा दिवस आणखी खास बनवू शकता.

मातृदिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

◆ सुखाची गं तू साऊली, मायेचा अथांग सागर… आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. मातृदिनाच्या खूप शुभेच्छा!

◆ माझ्या प्रत्येक यशामागे तुझी साथ आहे… जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे माझी आई! Happy Mother's Day!

◆ आई म्हणजे प्रेम, माया आणि निस्वार्थ जिव्हाळा… तुझं ऋण कधीच फेडू शकणार नाही. मातृदिनाच्या शुभेच्छा!

◆ माझ्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आयुष्यातील आनंदाचं कारण फक्त तू… आई, तुला मातृदिनाच्या खूप शुभेच्छा!

◆ स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून मुलांसाठी जगणाऱ्या प्रत्येक आईला मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

◆ तू आहेस म्हणून या आयुष्याला अर्थ आहे...अशीच कायम सोबत राहा! Happy Mother's Day!

◆ आई, तुझ्या मायेची ऊब आयुष्यभर साथ देणारी आहे… तुझ्यासारखं नातं जगात दुसरं नाही.

◆ तुझ्या एका मिठीत सगळा थकवा दूर होतो… आई, तू कायम अशीच हसत राहा. मातृदिनाच्या शुभेच्छा!

◆ माझ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहणाऱ्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

◆ आई म्हणजे घराचं हसू, कुटुंबाची ताकद आणि आयुष्याची खरी प्रेरणा… मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

◆ आई तुझ्या मायेच्या सावलीतच आयुष्याला खरी ऊब मिळते… मातृदिनाच्या खूप शुभेच्छा!

◆ माझ्या प्रत्येक चुकीला समजून घेणारी आणि प्रत्येक यशात आनंद मानणारी माझी आई… तू खूप खास आहेस!

◆ जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आईची मिठी… Happy Mother's Day!

◆ आई, तुझ्या कष्टांची आणि प्रेमाची किंमत शब्दांत मांडणं अशक्य आहे… तुला मनापासून प्रणाम!

◆ तुझं हसणं म्हणजे घरातील आनंद, आणि तुझी साथ म्हणजे आयुष्याची ताकद… मातृदिनाच्या शुभेच्छा!

◆ आई, तुझ्या एका शब्दाने धीर मिळतो आणि एका स्पर्शाने सगळं दुःख दूर होतं.

◆ माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण, पहिली शिक्षिका आणि सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझी आई!

◆ आईच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते… ते आयुष्यभर निस्वार्थपणे साथ देत राहतं.

◆ स्वतःपेक्षा मुलांच्या आनंदाचा विचार करणाऱ्या प्रत्येक आईला सलाम… मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

◆ आई, तुझं प्रेम हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे… Happy Mother's Day!

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार