Pixabay
लाईफस्टाईल

National Nutrition Month: दैनंदिन आहारामध्‍ये आवश्य समाविष्ट करा बदाम, जाणून घ्‍या महत्त्व

Almond: संतुलित आणि पौष्टिक आहार सर्वांगीण आरोग्‍यासाठी महत्त्वाचा आहे. योग्‍य पोषण आणि आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयींच्‍या महत्त्वावर भर देण्‍यासाठी १ सप्‍टेंबर ते ३० सप्‍टेंबरपर्यंत नॅशनल न्‍यूट्रिशन मंथ साजरा केला जातो.

Tejashree Gaikwad

Almond Benefits: संतुलित आणि पौष्टिक आहार सर्वांगीण आरोग्‍यासाठी महत्त्वाचा आहे. योग्‍य पोषण आणि आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयींच्‍या महत्त्वावर भर देण्‍यासाठी १ सप्‍टेंबर ते ३० सप्‍टेंबरपर्यंत नॅशनल न्‍यूट्रिशन मंथ साजरा केला जातो. यामुळे पोषणासंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी, व्‍यक्‍ती व समुदायांना सर्वोत्तम आहार निवडी करण्‍यास जागरूक, सक्षम व सामील करून घेण्‍यासाठी फोरम मिळतो. म्‍हणून, बदाम, संपूर्ण धान्‍य, भाज्‍या, फळे, शेंगा असे पौष्टिक खाद्यपदार्थ असलेल्‍या संतुलित आहाराचे सेवन करणे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. बदामांमध्‍ये व्हिटॅमिन ई, मॅग्‍नेशियम, प्रोटीन, झिंक, पोटॅशियम व डायटरी फायबर यांसह १५ आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, जे एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्‍यूट्रिशन (एनआयएन)ने नुकतेच भारतीयांसाठी डाएटरी गाइडलाइन्‍स जारी केले, जे बदाम उत्तम आरोग्‍यासाठी दररोज सेवन करता येईल असे नट असल्‍याचे मानते. दररोज बदामांचे सेवन केल्‍याने विविध आरोग्‍यसंबंधित फायदे मिळतात, जसे वजनावर नियंत्रण, हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण राहते.

फिटनेस नित्‍यक्रमासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ''मी आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याचे काटेकोरपणे पालन करते आणि पोषणावर बारकाईने लक्ष ठेवते, कारण ते आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे. मी प्रत्‍येक आहारामध्‍ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्‍यासाठी माझ्या आहाराचे नियोजन करते. मी शूटिंगसाठी किंवा मुलाखतीसाठी बाहेर जाते तेव्‍हा बदामांसारखे आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स सोबत ठेवण्‍याची खात्री घेते. यामुळे मला दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही आणि मूठभर बदामांचे सेवन केल्‍याने माझ्या दैनंदिन पोषण गरजांची पूर्तता होण्‍यास मदत देखील होते. म्‍हणून, यंदा नॅशनल न्‍यूट्रिशन मंथ निमित्त आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयींचा अवलंब करूया आणि आपल्‍या आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्‍याचा प्रयत्‍न करूया.''

नॅशनल न्‍यूट्रिशन मंथबाबत मत व्‍यक्‍त करत दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेअर येथील डायटेटिक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ''सहजपणे उपलब्‍ध होणारे जंक फूड व एचएफएसएस (हाय फॅट, शुगर, सॉल्‍ट) सेवन करणे, धावपळीची जीवनशैली आणि मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, हृदयसंबंधित समस्‍या व लठ्ठपणा यांसारख्या जीवनशैली आजारांचे प्रमाण वाढत आहे. म्‍हणून, मी नेहमी आहार निवडींबाबत काळजी घेण्‍याची आणि आपल्‍याला दररोज आवश्‍यक असलेले पौष्टिक घटक मिळण्‍यासाठी संतुलित आहारामध्‍ये आरोग्‍यदायी पर्यायांचा समावेश करण्‍याची शिफारस करते. आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आहारामध्‍ये बदामासारख्‍या फूड्सचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, यामुळे आरोग्‍यसंबंधित विविध फायदे मिळतात, जसे वजन, घातक कोलेस्‍ट्रॉल व रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाण यांवर नियंत्रण राहते, तसेच आरोग्‍य उत्तम राहण्‍यामध्‍ये व सुधारण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.

न्‍यूट्रिशन व वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ''भारतात, आवश्‍यक पौष्टिक घटकांनी संपन्‍न आहार सेवन करण्‍याच्‍या महत्त्वाबाबत माहितीच्‍या अभावामुळे विविध आजारांमध्‍ये वाढ होत आहे. म्‍हणून, आपण बदामांसारख्‍या पौष्टिक घटकांचे नैसर्गिक स्रोत असलेल्‍या विविध खाद्यपदार्थांचे सेवन केले पाहिजे. नुकतेच आयसीएमआर-एनआयएनने जारी केलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांमधून निदर्शनास येते की, आरोग्‍यदायी आहाराचा भाग म्‍हणून दररोज बदामांसारख्‍या नट्सचे सेवन केले पाहिजे. फक्‍त एवढेच नाही, संशोधनांमधून निदर्शनास येते की बदाम एकूण आहार पद्धतींमध्‍ये सकारात्‍मक भूमिका देखील बजावू शकतात, टाइप २ मधुमेह व प्रीडायबेटिस असलेल्‍या व्‍यक्‍तींना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्‍हणून, आरोग्‍यदायी जीवनशैली संपादित करण्‍याचा सोपा व गुणकारी मार्ग म्‍हणजे दैनंदिन आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे.''

फिटनेस मास्‍टर पिलेट्स इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला म्‍हणाल्‍या, ''संतुलित, पौष्टिक आहार आणि नियमित शारीरिक व्‍यायाम सर्वांगीण आरोग्‍यासाठी आवश्‍यक आहे. नियमित व्‍यायाम करण्‍याव्‍यतिरिक्‍त मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना पॅकेजमधील किंवा अल्‍ट्रा-प्रोसेस केलेले फूड्स टाळण्‍याचा आणि बदामांसारख्‍या नैसर्गिक पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्‍याचा सल्‍ला देते. मी माझ्या दैनंदिन आहारामध्‍ये पोषण संपन्‍न बदामांचा समावेश करते. ते प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत आणि मी वर्कआऊट केल्‍यानंतर नियमितपणे बदामांचे सेवन करते. पौष्टिक बदाम विविध प्रकारे सेवन करता येऊ शकतात, असे असले तरी त्‍यामधून पौष्टिक फायदे मिळतात. म्‍हणून, कुठेही गेले तरी सोबत बदाम ठेवणे उत्तम आहे.''

एमबीबीएस व न्‍यूट्रिशनिस्‍ट डॉ. रोहिणी पाटील म्‍हणाल्‍या, ''यंदा नॅशनल न्‍यूट्रिशन मंथ निमित्त मी सर्वांना त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे बारकाईने लक्ष देण्‍याचे आणि आहार निवडींबाबत दक्ष राहण्‍याचे आवाहन करते. सध्‍याची धावपळीची जीवनशैली आणि त्‍यामुळे होणाऱ्या आरोग्‍यसंबंधित समस्‍या पाहता आपण पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करण्‍याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हीच बाब लक्षात घेत, मी माझ्या रूग्‍णांना नेहमी आहारामध्‍ये कोणत्‍या-ना-कोणत्‍या स्‍वरूपात बदामांसारख्‍या खाद्यपदार्थांचा समावेश करण्‍याचा सल्‍ला देते. बदाम स्‍वादिष्‍ट असण्‍यासोबत त्‍यामध्‍ये विविध पौष्टिक घटक देखील आहेत आणि संतुलित आहारामध्‍ये समाविष्‍ट करत हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास व रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते. अशा पौष्टिक पर्यायांना प्राधान्‍य देत तुम्‍ही तुमचे आरोग्‍य उत्तम ठेवू शकता.''

स्किन एक्‍स्‍पर्ट व कॉस्‍मेटोलॉजिस्‍ट डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता म्‍हणाल्‍या, ''आरोग्‍यदायी त्‍वचेची सुरूवात आतून पोषणासह होते आणि त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावते. दैनंदिन आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश केल्‍याने मोठा फरक होऊ शकतो. दररोज मूठभर बदामांसह फळे व भाज्‍यांचे सेवन केल्‍याने त्‍वचेचे यूव्‍ही किरणांपासून (अतिनील किरण) नैसर्गिकरित्‍या संरक्षण होऊ शकते. तसेच, बदामांमध्‍ये अॅण्‍टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई व आरोग्‍यदायी फॅट्स असतात, जे त्‍वचेला आतून पोषण देत कोमल बनवतात.''

साऊथ इंडियन अभिनेत्री वानी भोजन म्‍हणाल्‍या, ''आव्‍हानात्‍मक करिअर व वैयक्तिक जीवनामध्‍ये संतुलन राखणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक ठरू शकते, पण आरोग्‍याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. माझा सेल्‍फ-केअरवर दृढ विश्‍वास आहे आणि यासंदर्भात सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे आरोग्‍यदायी खाद्यपदार्थांच्‍या सेवनासह शरीराला उत्तम पोषण देणे. दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश केल्‍याने माझ्या एकूण आरोग्‍यामध्‍ये उत्तम बदल दिसून आला आहे. मला बदामांचे सेवन करायला आवडते आणि कुठेही गेल्‍यास सोबत बदामांने भरलेला डबा घेऊन जाते. या उत्तम सवयीचे पालन केल्‍याने माझे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत झाली आहे आणि मी सर्वांना अनारोग्‍यकारक खाद्यपदार्थांचे सेवन टाळण्‍यासाठी अशाच प्रकारच्‍या निवडी करण्‍याचे आवाहन करते.''

यंदा नॅशनल न्‍यूट्रिशन मंथ निमित्त आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये पोषणाची महत्त्वपूर्ण भूमिका जाणून घेऊया. आरोग्‍यदायी निवडी केल्‍याने पोषण व चैतन्‍य वाढण्‍यास मदत होऊ शकते, परिणामत: अधिक आरोग्‍यदायी जीवनासाठी मार्ग सुकर होऊ शकतो.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले