कृत्रिम एअर फ्रेशनरला म्हणा गुडबाय! घरात सजवा 'ही' नैसर्गिक सुगंध देणारी फुले 
लाईफस्टाईल

कृत्रिम एअर फ्रेशनरला म्हणा गुडबाय! घरात सजवा 'ही' नैसर्गिक सुगंध देणारी फुले

कृत्रिम एअर फ्रेशनरचा वास कितीही छान असला तरी तो नैसर्गिक फुलांच्या सुगंधाशी तुलना करू शकत नाही. हलका, ताजा आणि घरभर पसरत राहणारा हा नैसर्गिक सुगंध तुमच्या घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्मिती करतो.

Mayuri Gawade

कृत्रिम एअर फ्रेशनरचा वास कितीही छान असला तरी तो नैसर्गिक फुलांच्या सुगंधाशी तुलना करू शकत नाही. हलका, ताजा आणि घरभर पसरत राहणारा हा नैसर्गिक सुगंध तुमच्या घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्मिती करतो. एक फूलदाणी असो किंवा खिडकीजवळ ठेवलेलं छोटे पॉटेड प्लांट ही नैसर्गिक फुले तुमच्या घरातील वाईब चेंज करण्यासाठी परफेक्ट आहेत,

गुलाब

गुलाबाचा सौम्य पण उठावदार सुगंध कोणत्याही खोलीचं वातावरण आनंदी आणि ताजंतवानं करतो. इंग्लिश गुलाब, जुने देसी गुलाब किंवा चहाचे गुलाब हे प्रकार विशेष सुगंधी मानले जातात. डायनिंग टेबल, किचन काउंटर किंवा बेडसाइडवर ठेवलेला गुलाबांचा गुच्छ घरभर सौंदर्य आणि सुगंध दोन्ही पसरवतो.

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर घरातील वातावरण शांत, सुगंधी आणि आनंददायी बनवतो. हलक्या उन्हात ठेवलेलं छोटं पॉटेड लॅव्हेंडर प्लांट खिडकीजवळ, बेडरूममध्ये किंवा वर्क डेस्कवर अप्रतिम दिसतं. त्याचा सुवास घरात एक साधी पण ताजीतवानी हवा निर्माण करतो.

निशिगंधा

निशीगंधाचा सुगंध संध्याकाळची वेळ जवळ आली की आणखी गडद, मोहक होत जातो. व्हेसमध्ये ठेवलेला एक गुच्छ लिव्हिंग रूमला क्षणात सुगंधी करतो. फुलं एका वाटीत पाण्यावर तरंगत ठेवणं हा देखील एक सुंदर पर्याय आहे. फक्त यासाठी पाणी नेहमी स्वच्छ ठेवा.

मोगरा

मोगऱ्याचा सुगंध इतका स्वच्छ आणि प्रसन्न असतो की काहीच फुले संपूर्ण खोलीला सुवासिक करतात. खिडकीजवळ ठेवलेला छोटासा कुंडा किंवा छोट्या वाटीत ठेवलेल्या मोगऱ्याच्या कळ्या दोन्ही घराला ताजेतवाने ठेवतात. ह्याचे झाड उजेडात चांगले वाढते.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली